कांदळवन प्रतिष्ठानतर्फे पक्षी छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत हे पक्षी छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ऐरोली येथील ‘किनारी आणि सागरी जैवविविधता’ येथे या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रसिद्ध मराठी पर्यावरण लेखक व पक्षीतज्ज्ञ श्री. मारुती चितमपल्ली यांचा वाढदिवस (५ नोव्हेंबर) आणि बर्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे (१२ नोव्हेंबर) औचित्य साधून दरवर्षी ०५ ते १२ नोव्हेंबर हा आठवडा ‘पक्षी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने भारतभर विविध जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात’
हे ही वाचा:
‘…अन्यथा आत्मदहन करू’ ! शिक्षकांचा ठाकरे सरकारला इशारा
ग्लास्गोमध्येही पंतप्रधान मोदींचे कलम ३७० हटवण्यासाठी कौतुक
फडके रोड राहणार सुना सुना, जमावबंदी लागू
स्वातंत्र्यवीरांवर होणाऱ्या क्षमापत्रांच्या आरोपाचे सप्रमाण खंडन करणारे अक्षय जोग यांचे नवे पुस्तक
यावर्षी, कांदळवन प्रतिष्ठानाने देखील या सप्ताहाच्या निमित्ताने ‘पक्षी छायाचित्र स्पर्धा’ आयोजित केली होती. या स्पर्धेचा विषय ‘महाराष्ट्रातील किनारी आणि पाणथळ पक्षी’ असा होता. या अंतर्गत पोर्ट्रेट (Potrait), वर्तन (Behaviour), मानव व पक्षी (Anthropogenic) आणि निसर्गातील सौंदर्य (Art in Nature) अशा ४ श्रेणी तयार करून प्रत्येक श्रेणीत विजेते निवडले जाणार आहेत.
या स्पर्धेतील सर्वोत्तम छायाचित्रे ‘पक्षी सप्ताह विशेष’ छायाचित्र प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन महाराष्ट्र वन विभागाच्या ऐरोली येथील ‘किनारी आणि सागरी जैवविविधता’ केंद्रात लावण्यात आले आहे. ५ नोव्हेंबर पासून हे प्रदर्शन पर्यटकांसाठी खुले केले जाणार आहे. केंद्राची माफक प्रवेश फी रू. ५० देऊन प्रदर्शन आणि केंद्रातील इतर माहितीपूर्वक स्थळांना पर्यटक भेट देऊ शकतील.