क्रांतिसूर्य बिरसा मुंडा पुण्यतिथीनिमित्त मोखाड्यात कार्यक्रम

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा पुण्यतिथीनिमित्त मोखाड्यात कार्यक्रम

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोळी महासंघ पालघरच्या आणि आत्मोन्नती विश्वशांती आनंद संप्रदाय वारकरी मंडळ,समाज उन्नती संघटना,युवा समाज प्रबोधन मंडळ यांच्या मार्फत पुण्यतिथी कार्यक्रम व वारकरी मेळावा तुळयाचापाडा मोऱ्हाडा ता.मोखाडा जि.पालघर येथे आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी अनुसूचित जाती जमातीचे १०१ जातीचे दाखले मोफत वाटप, वारकरी संप्रदायासाठी ३ मृदंग व ३ गायन पेटी (हार्मोनियम ) वाटप,२ जनसेवा केंद्राचे उद्घाटन,२ सेट संगणक वाटप करण्यात आले.

हे ही वाचा:

“राहुलजींनी गांधीच राहावं, सावरकर होण्याच्या भानगडीत पडू नये”

परदेशात बँक खाते आहे का, किती रक्कम आहे? ईडीने राहुलना विचारले!

सदाभाऊ खोतांची विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार

“राहुलजींनी गांधीच राहावं, सावरकर होण्याच्या भानगडीत पडू नये”

 

यावेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार.श्री.रमेश दादा पाटील, विश्वनाथ पाटील कुणबी सेना प्रमुख,गोपाळ महाराज, रामदास लहारे महाराज, माजी सभापती जयराम निसाळ,जिल्हा प्रमुख तन्मय साखरे,रामदास लहारे जिल्हा संघटक, सुशील ओगले कोकण विकास आघाडी अध्यक्ष,ज्योती ताई सारसे तालुका अध्यक्ष, हेमंती ताई भुसारे, मुरलीधर कडू, कोमल ताई जोशी कोळी महासंघ महिला संघटक, पुष्पा ताई पाटील, गीतांजली वाघ, भावेश मनीवडे, किशोर वैती, राजेंद्र मोरे तसेच मोठ्या संख्येने अदिवासी समाज बांधव,वारकरी बांधव,कोळी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version