अंतराळातून ‘बिपरजॉय’ असं दिसतं!

अंतराळवीर सुलतान अलनेयादी यांनी वादळाचे टिपले फोटो

अंतराळातून ‘बिपरजॉय’ असं दिसतं!

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपरजॉय’ चाक्रीवादळाने भीषण स्वरूप घेतलं असून गेल्या काही दिवसांपासून देशात त्याचीचं चर्चा पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे गुरुवार, १५ जून रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास हे चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ भागातील जखाऊ बंदराला धडकणार आहे. अशातच धडकी भरवणाऱ्या या चक्रीवादळाचे फोटो समोर आले आहेत. विशेष म्हणजे हे फोटो अंतराळातून घेतले असून त्याचे स्वरूप पाहून त्याची तीव्रता लक्षात येत आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये सध्या संशोधन करणारे अंतराळवीर सुलतान अलनेयादी यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ जारी करून बिपरजॉय चक्रीवादळाचे काही फोटो पाठवणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून काढलेले चक्रीवादळाचे तीन फोटो आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केले आहेत. अंतराळातून काढलेल्या या फोटोंमधून चक्रीवादळाचं भयानक रुप पाहायला मिळत आहे. वादळाचे भीषण रूप यात स्पष्ट दिसून येत आहे. बिपरजॉय चक्रीवाजळाची अवकाशातून काढलेली छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

हे ही वाचा:

संजय राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्याकडून स्वतःलाच धमकी दिली

संजय राऊत धमकीप्रकरणात पाचवी अटक; सुनील राऊत यांच्याशी कनेक्शन असल्यामुळे खळबळ

वरिष्ठांचा त्रास; आत्महत्येआधी दलित युवकाने केली पोस्ट

न्यूझीलंडची अर्थव्यवस्था मंदीत!

दरम्यान, वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकार आणि केंद्र सरकार सतत या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारी म्हणून किनारी भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. गुजरातमधील किनारी भागातील लोकांना सुरक्षीतस्थळी हलवण्याचे काम सुरु असून आतापर्यंत सुमारे ७४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याची माहिती आहे. खबरदारी म्हणून एनडीआरएफची ३३ पथके तैनात करण्यात आली आहेत. मुंबईतही खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनारे बंद ठेवण्यात आले आहेत.

Exit mobile version