बिपीन रावत यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  

बिपीन रावत यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  

तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज शुक्रवारी १० डिसेंबर रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचे पार्थिव काल मिलिट्री विमानाने दिल्लीला आणण्यात आले.

काल तामिळनाडू येथून १३ जणांचे पार्थिव दिल्लीमधील पालमपूर येथे आणण्यात आले. यावेळी निधन झालेल्या १३ जणांचे कुटुंब उपस्थित होते. कुटुंबियांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही आदरांजली अर्पण केली. त्यानंतर तिन्ही दलाच्या प्रमुखांनीही श्रद्धांजली अर्पण केली.

हे ही वाचा:

रोहित आता ‘टॉप’ वर

कोण होणार नवे CDS?

महाराष्ट्र सदनातील खोलीत भुजबळ बंद!

काँग्रेसने मतदानाला १२ तास असताना उमेदवार बदलला

शुक्रवारी सीडीएस बिपीन रावत यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवले जाईल. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.  त्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. दिल्लीच्या कॅन्टॉन्मेंटमधील ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील.

Exit mobile version