बिपिन फुटबॉल अकादमीच्या वतीने ३४व्या आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ३१ डिसेंबर २०२२ आणि १ जानेवारी २०२३ या दिवशी ही स्पर्धा होईल. अकादमीतर्फे जे मोफत फुटबॉल शिबीर घेण्यात आले होते. त्यातील ही ८ केंद्रे या स्पर्धेत खेळणार आहेत.
१६ वर्षांखालील मुलांसाठी या स्पर्धेचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. ही स्पर्धा दहिसर येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानावर होणार आहे. या स्पर्धेत आठ संघ खेळणार असून त्यात बोरिवली, वसई-विरार, कल्याण, कुर्ला, उल्हासनगर, कुलाबा, अंधेरी व मदनपुरा या केंद्रांचा समावेश आहे, अशी माहिती स्पर्धेचे समन्वयक सुरेंद्र करकेरा यांनी दिली.
हे ही वाचा:
आरएसएसने नाही काँग्रेसनेच नेहमी संविधानाला नुकसान पोहचवले
चित्रपट निर्माता-दिग्दर्शक नितीन मनमोहन यांचे निधन
सीआरपीएफ म्हणते, राहुल गांधी स्वतःच करतात सुरक्षा नियमांचे उल्लंघन
उझबेकिस्तानमध्ये सिरप प्यायल्याने ‘इतक्या’ मुलांचा मृत्यू
स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी फुटबॉलपटू तसेच महिंद्रचे प्रशिक्षक हरीश राव यांच्या हस्ते तर स्पर्धेचे पारितोषिक वितरण खासदार गोपाळ शेट्टी, माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू स्टीव्हन डायस यांच्या उपस्थितीत होईल. अंतिम सामना १ जानेवारी २०२३ला दुपारी ४ वाजता खेळविण्यात येईल.
या स्पर्धेसाठी दोन गट करण्यात आले असून त्यात अ गटात कुलाबा, बोरिवली, कल्याण आणि कुर्ला ही केंद्रे तर ब गटात उल्हासनगर, अंधेरी, वसई विरार, मदनपुरा ही केंद्रे आहेत. ३१ डिसेंबरला सकाळी ८ पासून सामन्यांना सुरुवात होईल. ११ वाजेपर्यंत चार सामने तर दुपारी १ ते ४ या वेळेत आणखी ४ सामने खेळविले जातील. १ जानेवारी २०२३ला तिसरी फेरी सकाळी ९ वाजता सुरू होईल. त्यानंतर दुपारी २ आणि ३ वाजता अशा दोन उपांत्य लढती होतील. ४.३० वाजता अंतिम सामन्याला प्रारंभ होईल. अधिक माहितीसाठी संपर्क आलोक कनौजिया ९२२०८८९०८१, शेफाली राणे ९८९२५३३५५५