‘बिपरजॉय’चा असाही वादळी विक्रम

क्यार चक्रीवादळाचा कार्यकाळ नऊ दिवस आणि पंधरा तास

‘बिपरजॉय’चा असाही वादळी विक्रम

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ हे नाव गेले कित्येक दिवस आपल्या कानावर पडतंय. बिपरजॉय चक्रीवादळ आज इथे धडकेल, उद्या तिथे धडकेल अशा बातम्या येत आहेत. अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाने एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. १९८२ पासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळांपैकी बिपरजॉय हे सर्वाधिक काळ टिकलेले चक्रीवादळ ठरले आहे.

 

अरबी समुद्रात ६ जून रोजी सकाळी साडेपाच वाजता बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झाले. या चक्रीवादळाला आता नऊ दिवस लोटले आहेत आणि अजूनही हे कोणत्याही किनारपट्टीला धडकलेले नाही. आता हे चक्रीवादळ मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्ट्टी भागात धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे चक्रीवादळ १५ जूनला धडकणार असल्याने त्याचा एकूण कालावधी दहा दिवसांचा होऊन ते सर्वाधिक काळ टिकलेले चक्रीवादळ म्हणून नोंदवले जाईल. याआधी २०१९ साली अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार चक्रीवादळाचा कार्यकाळ नऊ दिवस आणि पंधरा तास इतका होता.

हेही वाचा :

मोबाईलसाठी एक लाख चोरले, पण वडिलांच्या धाकाने केली आत्महत्या!

दिल्लीपेक्षा उंच एस्केलेटर आता मुंबईत; टी २ मेट्रो स्टेशनमध्ये होणार

वसईत धर्मांतरप्रकरणी मुंब्र्यातून एकाला अटक

अमेरिकी राजदूत डोभालबद्दल म्हणाले, उत्तराखंडच्या गावातला मुलगा राष्ट्राचा आधार बनला!

बिपरजॉय वादळाने काय होऊ शकते याचा ट्रेलर कोकण आणि मुंबईने पाहिलाय. या वादळाच्या प्रभावामुळे रत्नागिरीच्या गणपतीपुळ्यात रविवारी उंच लाटा उसळून काही पर्यटक गंभीर जखमी झाले होते आणि अतोनात नुकसानही झाले. सोमवारी जुहू किनाऱ्यावर आठ मुले बुडून त्यांचा मृत्यू झाला.

 

बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केले आहे. देशभरात या वादळाचा परिणाम पाहायला मिळत आहे. गुजरात आणि महाराष्ट्र चक्रीवादळामुळे अलर्टवर आहे. हे चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागातील जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारपट्टी भागात तटरक्षक आणि एनडीआरएफ पथकं तैनात करण्यात आली आहेत.

Exit mobile version