अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपरजॉय’ वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे वादळ पाकिस्तानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून वादळाचा फटका गुजरातला बसला आहे. हे वादळ आणखी भीषण स्वरूप धारण करू शकते, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ३० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.
१५ जून रोजी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सरकारकडूनही याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातला जाणाऱ्या ६७ रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी मंगळवार, १३ जून रोजी चक्रीवादळ बिपरजॉयच्या तयारीची आढावा बैठक घेतली.
हे ही वाचा:
वडिलांनी ३० वर्षे काम केलेल्या वसतिगृहातचं मुलाने तरुणीची केली हत्या
रील बनवताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
सात महत्त्वाच्या शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी अडीच हजार कोटींचे प्रकल्प उभारणार
ट्यूशन क्लासला दांडी मारून समुद्रकिनाऱ्यावर गेले अन् समुद्रात ओढले गेले
‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी लोकांना वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत ३० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.