टिकली, लिपस्टिक अन् हातकड्या… परीक्षेत मुलगी असल्याचे भासवणाऱ्या पंजाबमधील मुलाला अटक!

बायोमेट्रिक माहिती पडताळून पाहताच त्याचे पितळ उघड

टिकली, लिपस्टिक अन् हातकड्या… परीक्षेत मुलगी असल्याचे भासवणाऱ्या पंजाबमधील मुलाला अटक!

मुलगी असल्याचे भासवून परीक्षा देणाऱ्या तरुणाला पंजाबच्या फरिदाकोट पोलिसांनी अटक केली आहे. या मुलाचे नाव अंग्रेज सिंग असे आहे ‘बाबा फारिद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स’ने विविध आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी परीक्षा घेतली होती. कोटकापुरा येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये ही परीक्षा सुरू असताना आरोपीला ७ जानेवारी रोजी अटक करण्यात आली. विद्यापीठाच्या प्रशासनाने बायोमेट्रिक यंत्राच्या साह्याने आरोपीला अटक केली. त्याने बनावट आधारकार्ड आणि मतदारकार्ड बनवले होते. मात्र बायोमेट्रिक माहिती पडताळून पाहताच त्याचे पितळ उघडे पडले.

विद्यापीठ प्रशासनाने याप्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे. यामागे अशा प्रकारे बनावट परीक्षार्थींचे मोठे जाळे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशाच प्रकारची घटना याआधीही घडली होती. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन सतर्क झाले आहे. हा मुलगा मुलीच्या वेषात परीक्षा केंद्रात आला होता. तेव्हा त्याने लाल बांगड्या, टिकली आणि लिपस्टिक लावली होती आणि मुलींचा वेष परिधान केला होता. ‘अंग्रेज हा फझिलिका येथील निवासी असणाऱ्या परमजीत कौर हिच्या नावाने परीक्षा देण्यासाठी आला होता,’ अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव सुद यांनी दिली.

हे ही वाचा..

शशी थरूर यांचे भाकीत… ‘भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास येईल’

मुंबई- काळाचौकी परिसरातील पालिकेच्या शाळेत सिलेंडर्सचा स्फोट!

शरद मोहोळ हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी रामदास मारणेला अटक!

अखिलेश यादव म्हणतात अयोध्येला नंतर जाणार

त्याला तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतले असून खऱ्या उमेदवाराचा अर्जही फेटाळण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ‘आम्हाला बाबा फरिद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस’कडून तक्रार मिळाली असून तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे फरिदाकोटचे पोलिस अधीक्षक जसमीत सिंग यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version