धोकादायक !! रेसिंगवर पैज लावत होते; ४२ बाईक आणि स्वार ताब्यात

खेरवाडी पोलिसांकडून मोठी कारवाई

धोकादायक !! रेसिंगवर पैज लावत होते; ४२ बाईक आणि स्वार ताब्यात

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर रात्रीच्या सुमारास मोटारसायकलच्या शर्यतीवर पैज लावणाऱ्या टोळ्यांवर वांद्र्यातील खेरवाडी पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी ४२ मोटार सायकलीसह ८२ मोटरसायकल स्वाराना ताब्यात घेऊन त्यांच्यावर त्यांच्यावर मोटार वाहन कायदा आणि जुगार कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईतील बीकेसी, वांद्रे रिक्लेमेंशन, पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात मोटरसायकल स्वाराकडून धोकादायक स्टंट केले जात आहे, त्याच बरोबर मोटरसायकलच्या शर्यती लावून त्यांच्यावर पैज लावून मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात आहे.

मुंबईत स्टंट आणि शर्यती लावणाऱ्या बाईकर्स गॅंग मोठ्या प्रमाणात असून या टोळ्यांकडून मुंबईच्या मोकळ्या रस्त्यावर स्टंटबाजी केली जात होती. मुंबई पोलिसांनी या टोळ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त यांनी सोमवारी या टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी परिमंडळ ८ मधील पोलीस ठाण्याचे एक पथक तयार केले होते.

हे ही वाचा:

CPL आंतरमहाविद्यालयीन स्वच्छता स्पर्धेत अभिनव महाविद्यालय सर्वोत्तम

अडीच वर्षांच्या कारभारावरून फडतूस कोण हे लोकांना ठाऊक आहे!

दादरमध्ये बब्बर शेअर टॅक्सीवाले, पादचाऱ्यांची शेळी

१४ देशात दडून बसलेत भारतातील २८ वाँटेड गुंड

या पथकाने पश्चिम द्रुतगती महामार्गावर सोमवारी रात्री शर्यती व स्टंटबाजी करणाऱ्या मोटरसायकल स्वारावर कारवाई करून ४२ मोटरसायकलसह ८२ जणांना ताब्यात घेतले. पश्चिम द्रुतगती महामार्गावर या बाईकर्स गॅंग जीवघेणे स्टंट तसेच शर्यती लावून त्याच्यावर लाखो रुपयांची पैज लावली जात होती अशी माहिती समोर आली. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या असून ८२ जणांविरुद्ध मोटरवाहन कायदा, जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version