बेटी बचाओ बेटी पढाओ बाबत बाईक रॅलीतून जनजागृती होईल

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन  

बेटी बचाओ बेटी पढाओ बाबत बाईक रॅलीतून जनजागृती होईल

यशस्विनी बाईक रॅलीच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानबाबत जनजागृती करण्याचे कार्य होत असल्याचे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी येथे केले. ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांच्या यशस्व‍िनी बाईक रॅलीस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडा दाखूवन पुढील त्यांना प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक पी. रणपिसे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते.

‘बेटी बचाव बेटी पढाओ’ हा संदेश घेऊन केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) च्या ७५ महिला जवान १५ राज्यामधून आणि २ केंद्रशासित प्रदेशातील १२१ जिल्ह्यातून अंदाजे १० हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. ३ ते ३१  ऑक्टोबर या कालावधीत या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीनगर, शिलाँग, कन्याकुमारी ते एकतानगर गुजरात असा प्रवास या रॅलीच्या माध्यामातून होणार आहे. या रॅलीचे महाराष्ट्र राज्यात सोलापूर येथे आगमन झाले. मुंबई येथे ही रॅली आली आहे. पुढील प्रवास करण्यासाठी शुभेच्छा देण्याकरिता गेट वे ऑफ इंडिया येथे केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि माहिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा.. 

हमासकडून दोन इस्रायली नागरिकांची सुटका!

पराभवानंतर सेहवागने काढली पाकिस्तानच्या संघाची लाज

हमासने मृतदेहाखांली ठेवली स्फोटके; सायनाइड बॉम्बचा केला होता वापर!

‘हिरण्यकश्य हा चित्रपट माझ्यासाठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरेल’

यावेळी महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेंतर्गत जीविका यादव, युक्ता कांबळे (चेंबूर), कस्तुरी देसाई (प्रभादेवी), इशान्वी गुंडाळे (भायखळा) आणि ज्ञानदा तेरवणकर यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप माहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक पी.रणपिसे यांनी तर सूत्रसंचालन जाई वैशंपायन यांनी केले. यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलातील पुरुष व माहिला जवान यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

 

 

 

 

Exit mobile version