केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा इंडी आघाडीवर हल्लाबोल केला आहे. बेगुसराय येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. गिरीराज सिंह म्हणाले की, तेजस्वी यादव, अखिलेश यादव आणि राहुल गांधी हे मुस्लिम व्होट बँकेचे ठेकेदार आहेत. त्यांचे सरकार सत्तेवर आल्यास ते बिहार आणि उत्तर प्रदेशात शुक्रवारची सुट्टी जाहीर करतील. ते पुढे म्हणाले, देशात राहुल गांधी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांचे सरकार स्थापन झाले तर हे लोक भारताचे पाकिस्तान आणि बांगलादेशात रूपांतर करतील.
हिंदूंचा बचाव करताना ते म्हणाले की, मंगळवारी हनुमानजीची पूजा केली जाते, सोमवारी महादेवाची पूजा केली जाते किंवा इतर दिवशी इतर देवी-देवतांची पूजा केली जाते, तर त्यांना सुट्टी द्यावी, असे आजपर्यंत कोणत्याही हिंदूने म्हटलेले नाही. पण व्होटबँकेचे राजकारण करणारे तेजस्वी यादव, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासारखे लोक मुस्लिमांचे रक्षणच करत नाहीत तर त्यांच्या शब्दाची अंमलबजावणीही करत आहेत, असे मंत्री गिरीराज सिंह म्हणाले.
हे ही वाचा :
राहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात निवड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार सामना !
‘महिलांसंबंधित गुन्ह्यांवर जलद निकालांची गरज’
केदारनाथमध्ये बिघडलेले हेलीकॉप्टर उचलून नेताना दोर तुटला आणि…
मंत्री गिरीराज सिंह एका वाक्यात स्पष्ट केले की, ‘भारतात एक देश एक कायदा चालणार’. आसाम सरकार एक देश एक कायदा लागू करण्याच्या प्रयत्नात असल्याने गिरीराज सिंह यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि आसाम विधानसभेचे आभार मानले.