बिहारमध्ये जातिनिहाय गणनेत ८१ टक्के हिंदू, ६३ टक्के ओबीसी!

देशात प्रथमच एखाद्या राज्याकडून अशी जातनिहाय जनगणना जाहीर केली

बिहारमध्ये जातिनिहाय गणनेत ८१ टक्के हिंदू, ६३ टक्के ओबीसी!

बिहार सरकारकडून जातीनिहाय गणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये ओबीसींची लोकसंख्या ६३ टक्के आहे. २७ टक्के लोकसंख्या मागास, तर ३६ टक्के अतिमागास आहे. दलितांची संख्या १९ टक्के तर अनुसूचित जमातींची संख्या केवळ २ टक्के एवढी आहे. देशात प्रथमच एखाद्या राज्याकडून अशी जातनिहाय जनगणना जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारने सोमवारी पत्रकार परिषदेत घेत जातीय जनगणनेची आकडेवारी जारी करण्यात आली. जातीय जनगणनेचं काम पूर्ण झालं असल्याचे बिहारचे मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.सरकारने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये १३ कोटी लोकसंख्या आहे. यामध्ये सर्वाधिक हिंदू ८१.९ टक्के आहेत. तर मुस्लिम १७.७ टक्के, ख्रिश्चन ०.०५ टक्के, शिख ०.०१ टक्के, बौद्ध ०.०८ टक्के, जैन ०.००९६ टक्के आणि अन्य धर्मीय ०.१२ टक्के आहेत.

अनुसूचित जमातीची म्हणजे एसटी प्रवर्गाची लोकसंख्या १.६८ टक्के आहे. बिहारमध्ये अनारक्षित सर्वसाधारण लोकसंख्या १५.५२ टक्के आहे. ब्राह्मणांची लोकसंख्या ३.६६ टक्के आहे. बिहारमधील भूमिहीन लोकसंख्या २.८६ टक्के आहे. बिहारमध्ये यादवांची लोकसंख्या १४ टक्के तर, कुर्मी समाजाची लोकसंख्या २.८७ टक्के आहे. मुसहरची लोकसंख्या ४० टक्के आहे.

हे ही वाचा:

छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण !

जमिनीच्या वादातून एकमेकांवर गोळीबार, ६ ठार!

गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरे काय म्हणाले?

एलॉन मस्क यांनी ट्रुडो यांच्याविरोधात थोपटले दंड!

आकडेवारी जाहीर झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट करून गणना करणाऱ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केलं आहे. जातनिहाय गणनेचा प्रस्ताव विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राज्य सरकार जात आधारित जनगणना करेल, हा निर्णय बिहार विधानसभेच्या सर्व ९ पक्षांच्या संमतीने घेण्यात आला. २ जून २०२२ रोजी याला मान्यता मिळाली. या आधारे राज्य सरकारने स्वत:च्या संसाधनातून जातनिहाय गणना केली आहे. जातीवर आधारित जनगणनेने केवळ जातीच उघड केल्या नाहीत तर प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीचीही माहिती दिली आहे. त्या आधारे सर्व घटकांच्या विकास आणि उन्नतीसाठी पुढील कार्य केलं जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जातनिहाय गणनेची आकडेवारी
मागास वर्ग – २७.१२८६ टक्के (लोकसंख्या – ३५४६३९३६)
अति मागास वर्ग – ३६.०१४८ टक्के (लोकसंख्या – ४७०८०५१४)
अनुसूचित जाती – १६.६५१८ टक्के (लोकसंख्या – २५६८९८२०)
अनुसूचित जमाती – १.६८२४ टक्के (लोकसंख्या – २१९९३६१)
अनारक्षित – १५.५२२४ टक्के (लोकसंख्या – २०२९१६७९)
एकूण लोकसंख्या -१३०७२५३१०

धर्मावर आधारित लोकसंख्या
हिंदू – ८१.९९ टक्के (लोकसंख्या – १०७१९२९५८)
इस्लाम – १७.७० टक्के (लोकसंख्या – २३१४९९२५)
ईसाई – ०.०५ टक्के (लोकसंख्या – ७५२३८)
सिख – ०.०११ टक्के (लोकसंख्या – १४७५३)
बौद्ध – ०.०८५१ टक्के (लोकसंख्या – १११२०१)
जैन – ०.००९६ टक्के (लोकसंख्या – १२५२३)
इतर धर्म – ०.१२७४ टक्के (लोकसंख्या – १६६५६६)
कोणताही धर्म नाही – ०.००१६ टक्के (लोकसंख्या – २१४६)

 

Exit mobile version