भारतीय लष्कर आणि पोलिस दलाला कुपवाडा जिल्ह्यात मोठे यश

भारतीय लष्कर आणि पोलिस दलाला कुपवाडा जिल्ह्यात मोठे यश

जम्मू- काश्मिर मधल्या कुपवाडा जिल्ह्यात तैनात केल्या गेलेल्या भारतीय सैन्याच्या तुकडीला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळील कार्नाह भागात मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा हस्तगत केल्यामुळे मोठे यश लाभले आहे. या बाबत भारतीय सैन्याने सोमवारी माहिती दिली आहे.

हा शस्त्रसाठा रविवारी संध्याकाळी हस्तगत करण्यात आला होता. सैन्याने दिलेल्या माहिती नुसार, ’२८ मार्च रोजी प्राप्त झालेल्या इंटलेजन्सनुसार भारतीय लष्कर आणि जम्मू- काश्मिर पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पाच एके रायफल, सात पिस्तुले मॅग्जिन्स आणि इतर काही शस्त्रसाठा हस्तगत केला.’

हे ही वाचा:

तृणमुलच्या गुंडांचे क्रौर्य, ८५ वर्षांच्या वृद्धेलाही मारले

संजय राऊतांची पुन्हा अर्ध्या तासात पलटी

…अखेर जहाज तरंगू लागले!!

ही कारवाई प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ असलेल्या धानी गावात करण्यात आली. ही कारवाई पाकिस्तानी सैन्याच्या लिपा खोऱ्यातील नजरेसमोर झाली.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार कर्नाह मध्ये नागरी प्रशासन आणि लष्कर जम्मू- काश्मिर केंद्र शासित प्रदेशाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी एकत्रितपणे काम करत आहे.

गेल्या दोन वर्षात सुमारे १६ हत्यारे आणि ५० किलोग्रॅम नार्कोटिक्स कर्नाहमधून जप्त करण्यात आले आहे. या कारवाईबाबत पोलिस दलाने ट्वीट देखील केले आहे. या ट्वीटमध्ये या कारवाईतून काय काय जप्त करण्यात आले त्याची माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version