गुजरातमधील काही भागांमध्ये केवळ पेप्सिकोच्या बटाटा चिप्स, लेजसाठी बटाट्याचे उत्पन्न घेतले जात होते. भारताने या बटाट्याच्या जातीचे पेटंट रद्द केले आहे त्यामुळे पेप्सिकोसाठी हा मोठा धक्का आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शुक्रवारी वनस्पती जाती आणि शेतकरी हक्कांचे संरक्षण (पीपीव्हीएफआर) प्राधिकरणाने हा आदेश जारी केला आहे.
दोन वर्षांच्या कायदेशीर खटल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून एप्रिल २०१९ मध्ये या वादाला सुरुवात झाली होती. पेप्सिकोने नऊ गुजरातमधील शेतकऱ्यांची FC5 जातीच्या बटाट्याचे उत्पन्न घेतल्याबद्दल तक्रार केली होती. ज्याचा वापर कंपनी लेजचे बटाटा चिप्स बनवण्यासाठी करते.
हे ही वाचा:
२२वी मिसाईल व्हेसल स्क्वॉड्रन ‘प्रेसिडंट स्टँडर्ड’ पुरस्काराने सन्मानित
लवकरच स्वदेशी ड्रोनविरोधी तंत्रज्ञान
‘ओबीसी आरक्षणाचा अध्यदेश गृहीत धरता येणार नाही’! ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
आंग सान स्यू की यांना चार वर्षांचा तुरुंगवास
मात्र, शेतकरी संघटनांनी केलेल्या विरोधामुळे महिनाभरातच हा खटला कंपनीने परत घेतला. मात्र, शेतकरी हक्क कार्यकर्त्या असलेल्या कविता कुरुगंटी यांनी पीपीव्हीएफआरकडे पेटंट रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. याचिकेमध्ये हे पेटंट रद्द करण्यासाठी त्यांनी भारत बियाणांच्या वाणांना कोणत्याही प्रकारचे अधिकार किंवा पेटंट मंजूर करत नाही, असे स्पष्टीकरण दिले होते.
पीपीव्हीएफआने आता कुरुगंटी यांच्या याचिकेशी सहमती दर्शवली असून FC5 बियाण्यांवरील पेटंट रद्द केले आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी विजयाचा दिवस असून पेप्सिको कंपनीला मात्र झटका बसला आहे.