देशमुखांना मारताना आरोपी आनंद लुटत होते, व्हीडिओ काढत होते!

एसआयटीकडून पुरावे न्यायालयात सादर

देशमुखांना मारताना आरोपी आनंद लुटत होते, व्हीडिओ काढत होते!

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटी पथकाने संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे व्हिडीओ कोर्टात सादर केले आहेत. या प्रकरणी अनेक पुरावे एसआयटी आणि सीआयडीने मिळविले आहेत. तर काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण केलेल्याचे व्हिडीओ आरोपींच्या मोबाईलमध्ये होते. मारहाणीचे ते व्हिडीओ आरोपींनी डिलीट केले होते. मात्र, एसआयटीने ते रिकव्हर करून कोर्टात सादर केले आहेत. या प्रकरणातील हा मोठा पुरावा मानला जात आहे.

या व्हिडीओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना मारत होते आणि आनंद लुटत होते, असे दिसत असल्याचे एसआयटीने म्हटले आहे. आरोपींनी हे व्हिडीओ स्वतःच्या मोबाईलमधून डिलीट केले होते, जे पथकाने आता रिकव्हर केले. एसआयटीने हे पुरावे न्यायालयात हजर केले आहे.

एसआयटीने कोर्टात सादर केलेल्या पुराव्यामध्ये, ४१ इंचचा एक गॅसचा पाईप आहे. या पाईपाच्या एका बाजूला काळ्या रंगाच्या करदोड्याने मूठ बांधली गेली आहे. तर लोखंडी तारेने एक मुठ आहे. तसेच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आलेला लाकडी दांडका देखील न्यायालयात सादर केला आहे. यासह मारहाणीत वापरण्यात आलेले लोखंडी रॉड, तलवारीसारखे शस्त्र आणि कोयता न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणी पथकाकडून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आज चार आरोपींना केज न्यायालय आणि सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये विष्णू चाटेला १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रतिक घुले, महेश केदार, जयराम चाटेला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

पुण्यात मजार बांधणारे झाले मुजोर, दत्त मंदिराजवळच टाकली चादर!

टोरेस कंपनीला टाळे; तीन लाख लोकांना ५०० कोटींचा गंडा

‘आका’ सोरोसला पुरस्कार, कोणाला आठवले यूपीए सरकार ?

पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे विकासासाठी, तर उद्धव ठाकरेंची टीका ‘विनोदासाठी’

 

Exit mobile version