जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून एका दहशतवाद्याला अटक!

दारुगोळा जप्त

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून एका दहशतवाद्याला अटक!

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात २४ ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातील एका मजुराला गोळ्या घालून जखमी केले होते. या प्रकरणी सुरक्षा दलाने कारवाई करत सोमवारी (१८ नोव्हेंबर) एका दहशतवाद्याला अटक केली आहे, मजुरावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असल्याचे सुरक्षा दलाने म्हटले आहे. त्याच्याकडून काही शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

जम्मू आणि काश्मीर पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्याच्या उपस्थितीची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती, त्याआधारे पिंग्लिश गावातील बागांमध्ये शोध मोहीम राबवण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान लष्कर-ए-तैयबाशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली.

इर्शाद अहमद चोपन असे दहशतवाद्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी इर्शादचा मजुरावरील हल्ला यांसारख्या अनेक प्रकरणांमध्ये सहभाग होता. या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

आपमधून नाराज होऊन बाहेर पडल्यानंतर कैलाश गेहलोत यांचा भाजपमध्ये प्रवेश!

मणिपूरमधील हिंसाचाराशी संबंधित तीन प्रमुख प्रकरणे एनआयएकडे वर्ग

औरंग्या फॅन क्लबकडे लोकांची पाठ, उबाठांना मिळतेय रिकाम्या खुर्च्यांची साथ!

दिल्या घरी सुखी रहा, स्वतःच्या जुन्या कॅसेट स्वतः ऐकत बसा!

 

 

Exit mobile version