नफे सिंग राठी हत्या प्रकरणी गोव्यातून दोन शूटर्सना अटक!

झज्जर पोलीस, दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि हरियाणा एसटीएफची संयुक्त कारवाई

नफे सिंग राठी हत्या प्रकरणी गोव्यातून दोन शूटर्सना अटक!

हरियाणातील नफे सिंग राठी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे.हरियाणा पोलिसांनी गोव्यातून २ शूटर्सना ताब्यात घेतले आहे.या आरोपींना सोमवारी (४ मार्च) बहादूरगड न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणा पोलिसांनी गोव्यातून २ शूटर्सना अटक केली आहे.सौरव आणि आशिष अशी अटक करण्यात आलेल्या शूटर्सची नावे आहेत. झज्जर पोलीस, दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि हरियाणा एसटीएफ यांच्या संयुक्त कारवाईत आरोपींना गोव्यातून पकडण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी सौरभ हा नांगलोई येथील रहिवासी आहे.

हे ही वाचा:

१० लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी छत्तीसगडमध्ये ठार, जवानही हुतात्मा!

भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रोसेवेचे उद्घाटन मोदी करणार

शाहबाज शरीफ यांचा आळवला काश्मीर राग!

निवडणुकीत दारुण पराभव दिसू लागल्याने ठाकरेंचं ईव्हीएमवर बोट!

पोलिसांनी सांगितले की, या अगोदर आरोपींना पकडण्यासाठी त्यांचे फोटो व्हायरल केले होते.तसेच या आरोपींवर प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.दरम्यान, हरियाणा पोलिसांच्या एसटीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष टीमने हरियाणा-पंजाबसह गुवाहाटी, गोरखपूर आणि नेपाळ सीमेवरील सर्व भागात त्यांची टीम तैनात केली होती.

पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी गोव्यात उपस्थित असून तेथून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या तयारीत आहेत.त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत आरोपी सौरव आणि आशिष या शूटर्सना गोव्यातून अटक केली.हे दोन्ही आरोपी कपिल सांगवान उर्फ ​​नंदू टोळीशी संबंधित असल्याचेही समोर आले आहे.या आरोपींना सोमवारी (४ मार्च) बहादूरगड न्यायालयात हजर केले जाणार आहे.

 

Exit mobile version