जुलै महिन्यात भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) चांद्रयान मोहीम लॉन्च केले होती. ही मोहीम यशस्वी देखील झाली आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिला देश ठरला. याचं मोहिमेच्या बाबतीत इस्रोला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. इस्रोने चांद्रयान- ३ प्रोप्युलशन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परत आणले आहे. यामुळे इस्त्रोने अंतराळ संशोधनात नवीन इतिहास रचला आहे. प्रोप्युलशन मॉड्यूल तीन महिने चंद्रावर राहिला. यामुळे आता इस्रोला फक्त चंद्रावरून पाठवलेली एखादी वस्तू परत आणणही शक्य झालं आहे.
१४ जुलै २०२३ रोजी इस्रोने मिशन मून लॉन्च केले होते. चंद्रयान- ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लॅण्डींग केले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणे हा चांद्रयान- ३ मोहिमेचा मुख्य उद्देश होता. हे एक मोठे यश होते आणि लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंगनंतर पृथ्वीवरील १४ दिवस कार्यरत होते. त्याच वेळी, प्रोप्युलशन मॉड्यूलचे काम लँडर मॉड्यूलला पृथ्वीपासून चंद्राच्या कक्षेत वेगळे करणे हे होते. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी चंद्रावरून पृथ्वीवर त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला. २२ नोव्हेंबर रोजी हे यान पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूतून गेले.
चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर विक्रमची झेप यापूर्वी यशस्वी ठरली होती. त्यानंतर इस्त्रोचे हे आणखी मोठे यश आहे. इस्त्रोने पाठवलेले प्रोप्युलशन मॉड्यूल चंद्राच्या १५० किमी कक्षेत फिरत होते. आता ते पृथ्वीच्या कक्षेत आहे. प्रोप्युलशन मॉड्यूल केवळ तीन महिने चंद्राच्या कक्षेत राहणार होते. पण, इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कार्यक्षमतेमुळे त्यात १०० किलो इंधन शिल्लक राहिले आहे. इस्रोने प्रोप्युलशन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यासाठी ते इंधन वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे परतीच्या मोहिमेतही महत्त्वपूर्ण माहिती संकलित करता येईल.
हे ही वाचा:
‘सर्व मांसाहार स्टॉल्स तात्काळ बंद करा’, भाजप आमदार महंत बालमुकुंद यांचे अधिकाऱ्यांना आदेश!
झोमॅटोवरून ऑर्डर केलेल्या बिर्याणीत सापडला मृत सरडा!
महाबिझ २०२४ समिटचे दुबई येथे आयोजन!
माऊंट मेरापी ज्वालामुखीचा उद्रेक; ११ गिर्यारोहकांचा मृत्यू, १२ बेपत्ता!
इस्रोने म्हटले आहे की प्रोप्युलशन मॉड्यूल १३ दिवसांत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करत आहे. या मॉड्यूलची कक्षा देखील बदलली गेली आहे. तसेच पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कोणत्याही उपग्रहाला प्रोपल्शन मॉड्यूल आदळण्याचा धोका नसल्याचे इस्रोने स्पष्ट केले आहे.