२६/११ चा आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा!

अमेरिकेच्या कोर्टाने दिली मंजुरी 

२६/११ चा आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा!

पाकिस्तानी वंशांचा कॅनडीचा व्यापारी तहव्वूर राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया राजनैतिक माध्यमातून सुरु आहे. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकार अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये सरकारने तहव्वूर राणाच्या अटकेसाठी, प्रत्यार्पणासाठी अर्ज केला होता. याला बायडन सरकारने त्यावेळी मंजुरी दिली होती आणि तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला होकारही दिला होता. यानंतर हे प्रकरण न्यायालयात होते.

त्यानंतर जस्टीस जॅकलिन यांनी ४८ पानांचा आदेश देत तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली. आदेशात त्यांनी म्हटले की, तहव्वूर राणाला या कटाबद्दल माहिती होती. तहव्वूर राणाचा लहान पणाचा मित्र डेव्हिड कोलमन हेडली हा लष्कर-ए-तैयबामध्ये होता. या दहशतवादी संघटनेसाठी डेव्हिड हेडली काम करत असल्याची माहितीही तहव्वूर राणाला होती. भारतात कट रचत असल्याची माहिती असूनही डेव्हिड हेडलीला तहव्वूर राणाने मदत केल्याचे कोर्टाने म्हटले.

हे ही वाचा  : 

नव वर्षाच्या पहिल्या दिवशी लखनऊ हत्याकांडाने हादरलं; चार बहिणींसह आईची हत्या

संतोष देशमुख प्रकरण, आरोपीच्या अटकेसाठी मस्साजोग ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन!

“केजरीवालांनी खोटे बोलण्याची आणि फसवणुकीची वाईट सवय सोडून द्यावी”

‘हे वर्ष नवीन संधी, अनंत आनंद घेऊन येवो’

तहव्वूर राणाच्या भारतातील कंपनीच्या माध्यमातून डेव्हिड हेडली भारतात आला. त्याने कंपनीच्या माध्यमातून काही व्यवहार केले होते. हे सर्व करत त्याने हल्ल्याची योजना आखली. त्यामुळे तहव्वूर राणाची यामध्ये मोठी भूमिका असल्याने त्याचे प्रत्यार्पण झाले पाहिजे अशी कोर्टाची भूमिका होती. त्यानुसार कोर्टाने तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली.

Exit mobile version