रोहित पवारांना ईडीचा झटका, बारामती अ‍ॅग्रो संबंधित कारखान्याची मालमत्ता जप्त!

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

रोहित पवारांना ईडीचा झटका, बारामती अ‍ॅग्रो संबंधित कारखान्याची मालमत्ता जप्त!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित असलेल्या कारखान्याची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.जवळपास ५०.२० कोटी रुपयांची ही मालमत्ता असल्याची माहिती समजत आहे.ईडीच्या कारवाईमुळे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.बारामती अ‍ॅग्रो या कंपनीचे मालक शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे आहेत.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीची काही दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू होती. यासाठी रोहित पवार यांची दोनवेळा चौकशीही करण्यात आली. या प्रकरणात ईडीने बारामती अ‍ॅग्रो संबंधित औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्यातील १६१.३० एकरची संपत्ती जप्त केली आहे. त्यामध्ये जमीन, शुगर प्लंट, साखर कारखान्याची इमारत आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत ५०.२० कोटी रुपयांची असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

सुधा मूर्तींची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती

“मराठा आरक्षणाअंतर्गत होत असलेली भरती प्रक्रिया न्यायालयाच्या अधीन राहणार”

१० बस बदलल्या, वेगवेगळे कपडे घातले.. बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट संशयितांची माहिती समोर!

अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनात ‘उघडपणे’ शस्त्र बाळगण्यास परवानगी!

रोहित पवारांवर आरोप काय?
कन्नड सहकारी साखर कारखान्याला उतरती कळा लागल्यानंतर राज्य सहकारी बँकेने लिलाव केला.हा कारखाना ५० कोटी रुपयांमध्ये रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडने खरेदी केला होता. या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता.या प्रकरणी ईडीकडून बारामती अ‍ॅग्रोची चौकशी सुरू होती.या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकातले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.

या लिलावात बारामती अ‍ॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या कंपन्या सहभागी आहेत. हायटेक कंपनीने लिलावासाठी पाच कोटी रूपयांची रक्कम भरली होती. ती रक्कम बारामती अ‍ॅग्रोकडून घेतल्याची चर्चा आहे. विविध बँकांतून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम बारामती अ‍ॅग्रोने कारखाना खरेदीसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, बारमती अ‍ॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी ईडीने मुंबईसह सहा ठिकाणी छापेमारी केली होती.या कंपनीची मालकी आमदार रोहित पवार यांच्याकडे आहे.या प्रकरणी आमदार रोहित पवार याना मागील वर्षी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती.तसेच दोन वेळा त्यांची चौकशी देखील करण्यात आली होती.अखेर ईडीने कारवाई करत कन्नड कारखान्याशी संबंधित संपत्ती जप्त केली आहे.

Exit mobile version