पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. इंडिया टीव्हीच्या बातमीनुसार, सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने अफगाणिस्तानात लढलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये पाठवले आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांना अशी माहिती मिळाली आहे की अफगाणिस्तानात लढलेले लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील शांततेच्या वातावरणामुळे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरच्या विकासाबाबतच्या बातम्यांमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला होता. त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरचे वातावरण बिघडवण्याच्या उद्देशाने दहशतवादी काश्मीरमध्ये घुसवले आहेत.
हे दहशतवादी अफगाणिस्तानात लढले आहेत. या दहशतवाद्यांबद्दल असे म्हटले जात आहे की ते अधिक धोकादायक आहेत. सुरक्षा दलांनी वेढलेले असतानाही ते पळून न जाता जबाबदारी घेतात आणि इतरांना पळून जाण्यास मदत करतात.
हे ही वाचा :
अंत्यसंस्काराचा खर्च टाळण्यासाठी वडिलांचा मृतदेह दोन वर्ष ठेवला कपाटात!
जम्मू-काश्मीरच्या कुपवाड्यात अज्ञातांकडून एका सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या!
मणिपूरमध्ये १० दहशतवाद्यांना अटक!
काँग्रेस नेता म्हणतो, आम्ही मोदींच्या पाठीशी, काश्मिरी जनता तिरंगा कधी हाती घेणार!
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी सुरक्षा दलांकडून शोधमोहीम राबवली जात आहे. शोध मोहिमेदरम्यान चकमकीच्या घटना घडत आहेत. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहेत. तसेच या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांवर प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. आतापर्यंत दहा दहशतवाद्यांची घरे सुरक्षा दलाने उध्वस्त केली आहेत. पुढील कारवाई सुरूच आहे.
#BreakingNews | पहलगाम हमले के बाद सबसे बड़ा खुलासा
अफगानिस्तान में लड़ चुके आतंकियों को कश्मीर भेजा गया#PahalgamAttack #TerroristAttack #IndianArmy #PMModi #Pakistan #PMModi @IMinakshiJoshi pic.twitter.com/1IM48ql4MZ
— India TV (@indiatvnews) April 27, 2025