अहमदाबादमधील १० शाळा उडवून देण्याचे धकमीचे प्रकरण नुकतेच घडले होते.६ मे रोजी अहमदाबादमधील शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या.या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.गुन्हे शाखेने हे प्रकरण उघडकीस आणले असून त्यात पाकिस्तानचे कनेक्शन समोर आले आहे. शाळांना बॉम्ब ठेवण्याची धमकी देणारा मेल पाकिस्तानातून आल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. हा मेल जिथून आला होता, त्या आयडीचा शोध गुन्हे शाखेने घेतला आहे. मात्र, यासाठी रशियन डोमेनचा वापर करण्यात आला.
या अगोदर दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बच्या धमकीचे मेल आले होते.यानंतर एकच खळबळ उडाली होती.त्यावेळी शोध पथकाच्या हाती काहीच लागले नाही.त्यानंतर थोड्याच दिवसात अहमदाबादमधील अशा धकमीचा मेल आला.यानंतर पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला. तथापि, नंतर तो खोटा धोका असल्याचे म्हटले गेले. पोलिसांनी सर्व शाळांची झडती घेतल्यानंतर ती बनावट असल्याचे घोषित केले. अहमदाबाद शहर गुन्हे शाखेने दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, माहिती मिळाल्यानंतर पोलीस, बॉम्बविरोधी पथक, श्वान पथक आणि गुन्हे शाखेचे पथक या शाळांमध्ये पोहोचले आणि त्यांची कसून झडती घेतली. मात्र शोध मोहिमेदरम्यान कोणतीही स्फोटके सापडली नाहीत.
हे ही वाचा:
‘हिंदू दहशतवादा’चे पितृत्व पवारांचेच,ले.कर्नल पुरोहीतांचा गौप्यस्फोट…
“अनिल देशमुखांचे सत्य योग्य वेळी बाहेर काढणार”
‘अबब! १५ कोटी रुपयांचे ड्रग्स कॅप्सूल पोटात ठेवून तस्करी करणारा मुंबई विमानतळावर अटक’
११ वर्षांनंतर निकाल डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा; तिघे निर्दोष, दोन आरोपींना जन्मठेप
दरम्यान, अहमदाबादमधील शाळेंना मिळालेली धमकी पाकिस्तानातून आल्याचे उघड झाले आहे.गुन्हे शाखेच्या तपासात हे समोर आले आहे.धमकीचा मेल जिथून आला होता, त्या आयडीचा शोध गुन्हे शाखेने घेतला आहे.मात्र, यासाठी रशियन डोमेनचा वापर करण्यात आला आहे.या प्रकरणात तपास पथकाकडून अधिक तपास सुरु आहे.