मुंबईसह ठाणे पोलीस दलात मोठा फेरबदल

आव्हाड यांना अटक करणाऱ्या पोलीस उपायुक्त यांची बदली

मुंबईसह ठाणे पोलीस दलात मोठा फेरबदल

मुंबईसह ठाणे पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. इतर जिल्ह्यातून बदली होऊन आलेल्या पोलीस उपायुक्तांच्या विविध विभागात नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करणारे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांची ठाणे वाहतुक शाखा या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

मुंबईतील गुन्हे शाखेच्या दोन्ही पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आलेली असून गुन्हे शाखा (प्रकटीकरण) प्रशांत कदम तर गुन्हे शाखा (प्रकटीकरण १) कृष्णकुमार उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांची सायबर गुन्हे विभाग आणि प्रकटीकरण एकचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांची नियुक्ती आर्थिक गुन्हे शाखेत करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी राज्यातील १०९ पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकारी यांच्या बदल्याची यादी जाहीर करण्यात आली होती. यापैकी अनेक अधिकारी यांना मुंबई, ठाणे, नवीमुंबई या शहरांत बदलून आले होते. या बदल्यानंतर मुंबईसह ठाणे पोलीस दलात अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मुंबई बाहेर गेलेल्या परिमंडळ ९ चे मंजुनाथ सिंगे यांच्या जागी पोलीस उपायुक्त अनिल पारसकर यांना नियुक्त करण्यात आले आहे. परिमंडळ ५ मधून बदली होऊन गेलेले प्रणव अशोक यांच्या जागी मनोज पाटील यांची बदली करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

वांगं तेच, बिरबल आणि राऊतांची मजबुरीही सारखीच….

जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

बाबा रामदेव यांना धक्का; पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी

गोध्रा कटाच्या सूत्रधाराचा जामीन वाढविला

परिमंडळ १ हरि बालाजी
परिमंडळ २ अभिनव देशमुख
परिमंडळ ३ अकबर पठाण
परिमंडळ ४ प्रवीण मुंढे
परिमंडळ ५ मनोज पाटील
परिमंडळ ६ हेमराज राजपूत
परिमंडळ ७ पुरुषोत्तम कराड
परिमंडळ ८ दीक्षित गेडाम
परिमंडळ ९ अनिल पारस्कर
परिमंडळ १० महेश्वर रेड्डी
परिमंडळ ११ अजय बंसल
परिमंडळ १२ स्मिता पाटील
परिमंडळ (बंदर) संजय लाटकर

Exit mobile version