कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माणिकराव कोकाटे यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. फसवणूक प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन वर्षांचा कारावास आणि ५०,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी त्यांनी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले होते. यावर आज सुनावणी पार पडल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाल्याने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर कोकाटे बंधूंना जामीन मंजूर करण्यात आला. अपीलाचा निकाल येईपर्यंत शिक्षेला स्थगिती असणार आहे. कोकाटेंच्या वकिलांनी सांगितले की, दोन वर्षांच्या अपात्रतेचा जो प्रश्न आहे, त्यावर कोर्ट उद्या (२४ फेब्रुवारी) स्वतंत्र ऑर्डर करेल. याबाबत सरकारी वकील आपली बाजू मांडणार आहे, असे वकिलांनी सांगितले.
हे ही वाचा :
नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात राजकीय वक्तव्य करण्याची गरज नव्हती
हे साहित्य संमेलन की भंपकांचा तमाशा?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, अक्षय कुमार, कैटरीना कैफ यांनी संगमात केले स्नान!
बांगलादेशमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला; एकाचा मृत्यू
प्रकरण काय?
१९९५- १९९७ च्या दरम्यानचे हे प्रकरण असून माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांच्यावर कागदपत्रे फेरफार आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री कोट्यातून कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून कमी दरात घरे उपलब्ध केली जातात आणि यासाठी इच्छुक व्यक्तीला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानुसार कोकाटे बंधूंनी दोन सदनिका प्राप्त केल्या. तसेच आणखी दोन सदनिका इतरांना मिळवून देवून त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता.
या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन (कमाल मर्यादा विनियमन) विभागाचे तत्कालीन विश्वनाथ पाटील यांनी ॲड. माणिक कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध बनावट दस्तावेजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली होती. त्यावरून चार जणांविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.