कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ८ नौदल अधिकाऱ्यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती!

भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली माहिती

कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ८ नौदल अधिकाऱ्यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती!

कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे.गेल्या वर्षी आठ नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये अटक करण्यात आली होती.त्यानंतर कतारच्या न्यायालयाने या आठ अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.न्यायालयाच्या या निर्णयावर भारत सरकारने आश्चर्य व्यक्त केले होते.

भारतीय नौदलाचे हे आठही माजी अधिकारी गेल्या ऑगस्टपासून कतारच्या तुरुंगात आहेत. या सर्व माजी अधिकाऱ्यांवर लावण्यात आलेल्या आरोपांची माहिती कतारने अद्याप दिलेली नाही. मात्र, या सर्वांवर हेरगिरीचा आरोप असल्याचे या प्रकरणाशी परिचित लोकांचे म्हणणे आहे.

या संदर्भात भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक निवेदन जारी करत म्हटले की, दहरा ग्लोबल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या माजी नौदल अधिकाऱ्यांची शिक्षा कमी करण्यात आली आहे. कतारच्या कोर्ट ऑफ अपीलनं दिलेल्या सविस्तर निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करत आहोत, असे निवेदनात म्हटले आहे.यापुढे कसे पाऊल उचलावे यासाठी आम्ही कायदेशीर सल्लागारांच्या टीम सोबत आहोत.तसेच माजी अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आहोत.

हे ही वाचा:

ठाकरे गटाला २३ जागा मग आम्हाला काय? काँग्रेसचा सवाल!

दहशतवादी हाफिज सईदला आमच्या स्वाधीन करा!

पुण्यात दोन गॅंगनी एकमेकांविरोधात उगारले कोयते!

आयफेल टॉवर ‘संपावर’

निवेदनात पुढे म्हटले आहे की, “आज कतारच्या कोर्ट ऑफ अपीलमध्ये आमचे राजदूत आणि इतर अधिकारी दोषी अधिकाऱ्याच्या कुटुंबात सामील झाले होते. आम्ही खटल्याच्या सुरुवातीपासून त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आम्ही कायदेशीर सहाय्य देत राहू. आम्ही हे प्रकरण कतारी अधिकाऱ्यांकडेही मांडत राहू. प्रकरणाचे गांभीर्य आणि आवश्यक गोपनीयता लक्षात घेता, यावेळी अधिक भाष्य करणे योग्य होणार नसल्याचे भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, हे सर्व भारतीय नौदल अधिकारी कतारमधील एका खासगी कंपनीत काम करत होते.ही कंपनी कतारच्या नौदलाला प्रशिक्षण आणि इतर सेवा पुरवते. या कंपनीचे नाव दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असे आहे.रॉयल ओमाण हवाई दलाचे निवृत्त स्क्वाड्रन लीडर खामिस अल अजमी या कंपनीचे सीईओ आहेत.

 

Exit mobile version