मुंबईसह राज्याला मोठा दिलासा

मुंबईसह राज्याला मोठा दिलासा

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदवस वाढत आहे. राज्यात आज  ४८ हजार ७०० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज ७१ हजार ७३६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३६ लाख ०१ हजार ७९६ रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८२.९२ टक्के  झाले आहे. राज्यात एकूण ३६ लाख ९८ हजार ३५४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज एकूण ५२४ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर १.०५ टक्के आहे. आतापर्यंत एकूण ६५ हजार २८४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या ५२४ मृत्यूंपैकी २९३ मृत्यू मागील ४८ तासातील आहेत. तर ११६ मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ११५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.

हेही वाचा:

राजेश टोपेंची तात्काळ हकालपट्टी करा- किरीट सोमय्या

रिलायन्सकडून मुंबईसाठी ८७५ नवे अद्ययावत बेड

मोफत लसीकरणासाठी ठाकरे सरकार पैशाचे सोंग कुठून आणणार?

काही तासांत भारतात येणार ऑक्सिजन, अमेरिकेतून विमान निघालं

मुंबईत गेल्या २४ तासात ३८४० कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ५ लाख ४४ हजार ९५८ वर पोहोचली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ८६ टक्के आहे. सध्या ७० हजार ३७३ एकूण सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर ६२ दिवस आहे.

Exit mobile version