खुशखबर!! आरोग्य खात्यात भरणार १६ हजार पदे

खुशखबर!! आरोग्य खात्यात भरणार १६ हजार पदे

करोनाच्या संकटकाळात आरोग्य खात्यात प्रचंड प्रमाणात मनुष्यबळाची वानवा भासत आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची होणारी दमछाक लक्षात घेता राज्यातील महाविकास आघाडीला उशिरा का होईना जाग आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील १६ हजार जागांसाठी भर्ती करण्याचा निर्णय झाला आहे. आगामी काळात ही प्रक्रिया लवकर पूर्ण झाली तर आरोग्य विभागावरील ताण कमी होऊ शकेल.

हे ही वाचा:

‘मुंबई पोलिस रश्मी शुक्लांना अटक करू शकत नाहीत’

शिवसेना नेत्याचा ‘बड्डे’, कोविड नियमावलीचे तीन तेरा

कोविड लसींना पेटंटच्या पिंजऱ्यातून सोडवण्यास अमेरिकेचा पाठिंबा

चितांचा बाजार

गुरुवारी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, आरोग्य विभागात अ श्रेणीतील २ हजार पदे, ब श्रेणीतील २ हजार पदे, सी आणि डी श्रेणीतील १२ हजार पदांची भर्ती केली जाईल. त्यानुसार २ हजार डॉक्टर, २ हजार वैद्यकीय अधिकारी, १२ हजार नर्स, वॉर्ड बॉय, क्लर्क, शिपाई, वाहनचालक यांची भर्ती केली जाणार आहे. आता आठवड्याभरात पदभर्तीसाठी पावले उचलली जातील. अ श्रेणीतील पदे ही एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात येतील. ब श्रेणीतील पदांची भर्ती आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या पातळीवरील होईल.

जालना जिल्ह्याला सर्वाधिक रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्याच्या मुद्द्यावरून टोपे म्हणाले की, यासंदर्भात गैरसमज निर्माण झाला होता. १२ जिल्ह्यांसाठी जालना जिल्ह्याच्या नावावर ही इंजेक्शन आली होती. नंतर ती जालना जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांना वितरित करण्यात आली.

 

Exit mobile version