भारतीय जनता पक्ष ‘गाव चलो अभियान’ सुरु करण्याच्या तयारीत आहे.ही मोहीम ४ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत चालणार असून पक्षाचे मुख्य लक्ष गावांवर असणार आहे.या काळात देशातील ७ लाख गावांमध्ये भाजपचा किमान एक कार्यकर्ता उपस्थित राहणार आहे.नरेंद्र मोदी सरकारने विकासासाठी कोणती पावले उचलली हे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने गावातील लोकांना सांगण्यात येणार आहे.याशिवाय भाजपचे कार्यक्रते देशभरातील सर्व शहरी बूथवर पोहचून लोकांना विकासकामांची माहिती देण्यात आहेत.इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भाजपचे कार्यकर्ते या काळात राम मंदिराच्या उभारणीबाबतही चर्चा करतील.
यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हे मोठे अभियान राबवण्याचे नियोजन भाजपने केले आहे.या काळात पंतप्रधान मोदी देशभरात १४० हुन अधिक जाहीर सभा घेऊ शकतात.’गाव चलो अभियानातंर्गत’ प्रत्येक बूथवर पक्षाला ५१ टक्के मते मिळावीत, असे लक्ष ठेवण्यात आले आहे.जर २०१९ च्या निवडणुकीत भाजपने हे लक्ष गाढले गेले होते, तर यावेळी आणखी हा आकडा वाढेल.अशी माहिती आहे की, भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही असा प्रचार केला होता.असे मानले जाते की, मतदारांशी जोडण्यासाठी पक्षाचा फायदा झाला होता.
हे ही वाचा:
अयोध्येतील भुतो न भविष्यती सोहळा अनुभवण्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी
गुजरातमध्ये नाव उलटली, १० शाळकरी मुलांसह दोन शिक्षकांचा मृत्यू!
सचिन तेंडुलकरचा व्हिडीओ वापरला, तक्रार दाखल!
सचिन तेंडुलकरचा व्हिडीओ वापरला, तक्रार दाखल!
पक्षाकडून या प्रचारासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.या अंतर्गत राज्यस्तरीय संघ तयार करण्यात येणार असून त्यात एक निमंत्रक आणि चार सहसंयोजक असणार आहेत.विभागीय संघांमध्ये एक समन्वयक असेल जो गाव पातळीवर असेल तर एक समन्वयक शहर ठकाणी असले.ही मोहीम फेब्रुवारीला संपली तरी कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या संपणार नाहीत.लोकसभा निवडणुक संपेपर्यंत गाव आणि शहरातील बुथवर भेट देण्याऱ्या कार्यकर्त्यांची १५ दिवसातून एकदा तरी भेट घावी लागणार आहे.
तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी रॅली, जाहीर सभा आणि रोड शो करताना दिसतील.या दरम्यान पंतप्रधान १४० हुन अधिक लोकसभा मतदारसंघातील प्रभारींकडून पक्षाच्या उमेदवारांची माहिती घेणार आहेत.हे सर्व प्रभू राम मंदिर सोहळ्यानंतर होणार आहे, असे पक्षाच्या संबंधित लोकांनी सांगितले.