जम्मू-काश्मीरमध्ये चमत्कार, मुस्लिम कुटुंबाच्या घरात सापडले शिवलिंग आणि माता वैष्णोदेवीची मूर्ती!

दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी 

जम्मू-काश्मीरमध्ये चमत्कार, मुस्लिम कुटुंबाच्या घरात सापडले शिवलिंग आणि माता वैष्णोदेवीची मूर्ती!

जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील राजगढ भागात एका मुस्लिम कुटुंबाच्या घरात हिंदू देवतांच्या मूर्ती सापडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेक लोक याकडे एक चमत्कार म्हणून पाहत आहेत. राजगढच्या एका दुर्गम गावात राहणाऱ्या लियाकत अलीच्या घरात अनेक समस्या येवू लागल्या होत्या. त्याला दोन महिन्यात पाच वेळा साप चावला होता. यानंतर एवढ्या अडचणी पाहून लियाकत अली यांनी एका पीरला घरी बोलाविले. घरी आलेल्या पीरने त्याला घरात काहीतरी गाडले असून खोदकाम करा असेल सांगितले.

यानंतर लियाकत अलीने येथे उत्खनन केले आणि काही फूट खोदल्यावर त्याला माता वैष्णोदेवीची मूर्ती सापडली, त्यासोबत शिवलिंग आणि नंतर लाफिंग बुद्धाची मूर्ती सापडली. लियाकतने जेव्हा स्थानिक लोकांना हे सांगितले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले कारण या भागात सर्वाधिक लोकसंख्या मुस्लिमांची आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता हा चमत्कार पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी शेकडो लोक तेथे पोहोचत आहेत. सध्या येथे पूजा सुरू झाली आहे. प्रशासनाशी बोलल्यानंतर येथे सुरक्षेसाठी ग्रामरक्षक दलाचे सदस्य तैनात करण्यात आले असून, या मूर्तींच्या वयाचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : 

दिल्ली निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर

अभिनेत्री उर्मिला कोठारेंच्या कारने दोघांना उडवले, एकाचा मृत्यू 

फ्लॉवर नही फायर है नितीश रेड्डी!

बीड सरपंच देशमुखांच्या न्यायासाठी मूक मोर्चा!

 

Exit mobile version