केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारताने प्रथमच २४ तासात २० लाख लोकांना लस दिली गेली आहे. १६ जानेवारीपासून भारतात सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत हे प्रथमच घडले आहे.
हे ही वाचा:
मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार दिनांक ९ मार्च २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत देशभरात २५ तासात सुमारे २० लाख २० हजार लोकांना लस देण्यात आली होती. यामुळे आता देशभरात एकूण लसीकरण झालेल्या लोकांचा आकडा २.३ कोटींच्या आसपास पोहोचला आहे. मंत्रालयाच्या संकेतस्थळानुसार साधारण ७.५ लाख लोकांची चाचणी करण्यात आली.
भारतातील लसीकरण मोहिमेचे जागतिक स्तरावर कौतूक केले गेले आहे.
आजच, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख गीता गोपिनाथ यांनी भारताच्या कोविड-१९ विरूद्धच्या लसीकरण मोहिमेचे कौतूक केले आहे. त्यांनी भारताची लसीकरण मोहिम वाखाणण्यासारखी असल्याचे देखील सांगितले.
यावेळी गीता गोपिनाथ यांनी भारत जगाच्या कोविड-१९च्या विरोधातील लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे देखील सांगितले. त्याबरोबरच त्यांनी पुणे येथील सिरम इन्स्टिट्युटचे आभार देखील मानले आहेत.
१६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्च पासून सुरू करण्यात आला. या टप्प्यात ज्येष्ठ व्यक्तींसह ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या व सहव्याधी असलेल्या व्यक्तींना देखील लस देण्यात येणार आहे.