जम्मू काश्मीरमध्ये बांधला जातोय दहशतवाद्यांसाठी भलामोठा तुरुंग

कडेकोट बंदोबस्त... १०५ कोटींचा खर्च, अमित शहा यांनी दिली माहिती

जम्मू काश्मीरमध्ये बांधला जातोय दहशतवाद्यांसाठी भलामोठा तुरुंग

जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील महानपूरच्या डम्बुरा परिसरात केवळ दहशतवाद्यांसाठी तुरुंग बांधला जात आहे. १०५ कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या या तुरुंगात ६०० दहशतवादी एकाचवेळी राहू शकतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. शहा यांनी या वर्षीच्या सुरुवातीलाच या तुरुंगाचा दौरा केला होता.

अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीर आरक्षण (बदल) आणि जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयकांवरील चर्चेवर उत्तर देताना शून्य दहशतवाद धोरणाचा हवालाही दिला. जम्मू काश्मीरमधील दहशतवादाला होणारा निधी रोखण्याकडे सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी तीन वर्षांची योजना बनवण्यात आली आहे. जी योजना सन २०२६पर्यंत पूर्ण होईल.
१०५ कोटी खर्चून जम्मू काश्मीरमध्ये तुरुंग बनवला जात आहे. त्याची सुरक्षा कोणीच भेदू शकणार नाही. सद्यस्थितीत जम्मूमध्ये १४ तुरुंग आहेत. ज्यातील दोन केंद्रीय आणि १० जिल्हा तुरुंग आहेत. यात एक विशेष तुरुंगही आहे. या तुरुंगांची क्षमता तीन हजार ६२९ कैद्यांची आहे. मात्र या तुरुंगांत पाच हजार ३०० कैदी राहू शकतील, इतकी त्याची क्षमता वाढवण्याच्या दिशेने प्रशासन काम करत आहे.

हे ही वाचा:

संसदेच्या हल्ल्याला २२ वर्ष पूर्ण; पंतप्रधान मोदींनी शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली!

आयपीएलच्या टायटलमधून ‘टाटा’ला टाटा; बीसीसीआयकडून टायटल स्पॉन्सरसाठी टेंडर जारी

‘चकमकीत मारले गेलेले दहशतवादी त्याच जागी दफन’

महादेव बेटिंग ऍपच्या मालकाला दुबईत ठोकल्या बेड्या

जम्मू काश्मीरमधील दहशतवादी घटनांची आकडेवारी

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादामुळे ४२ हजार जणांचा जीव गेल्याची माहिती शहा यांनी राज्यसभेत दिली. याआधी लोकसभेमध्ये विधेयकावरील चर्चेदरम्यान शहा यांनी १९९४ ते २००४ दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये ४० हजार १६४ दहशतवादाच्या घटना घडल्याचे सांगितले. सन २००४ ते २०१४ दरम्यान सात हजार २१७ दहशतवादाच्या घटना घडल्या होत्या. तर, मोदी सरकारच्या सन २०१४ ते सन २०२३ या काळात सुमारे दोन हजार दहशतवादी घटना घडल्या होत्या. त्यामुळेच जम्मू काश्मीरमधील फुटीरतावाद आणि दहशतवादाचे मूळ कारण कलम ३७०च होते, याचा पुनरुच्चार शहा यांनी यावेळी केला.

Exit mobile version