महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, १२ हजार रोजगार होणार निर्माण

महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, १२ हजार रोजगार होणार निर्माण

राज्यात मोठे प्रकल्प आणण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार काम करत आहे. याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवदा ग्रुपच्या शिष्टमंडळाबरोबर राज्यात ग्रीन हायड्रोजन ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

अवदा ग्रुपचे विनीत मित्तल यांच्या नेतृत्वाखाली चर्चा पार पडली. राज्यात ४५ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्याबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. तसेच हा जागतिक स्तरावरील पहिला अनोखा प्रकल्प आहे. ज्यामुळे राज्यात किमान १२ हजार रोजगार निर्माण होतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनचा एक भाग म्हणून भविष्यातील स्वच्छ ऊर्जा म्हणून ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाकडे बघितले जाते. या प्रकल्पातून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होईल आणि सुमारे १२ हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. आम्ही अवदा ग्रुपला सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

‘या’ कारणामुळे ट्विटरच्या ‘ब्लू टिक’ पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय मागे

आरेमध्ये बिबट्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला

गजानन कीर्तिकरांचा उद्धव गटाला रामराम ; शिंदे गटात सामील

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८६५ वधारला तर निफ्टीतही वाढ

दरम्यान, राज्यातील रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा महाराष्ट्रासाठी एक घोषणा केली होती. महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारने दोन लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर केले आहेत. यापैकी काही प्रकल्पांवर सध्या काम सुरु आहे. हे प्रकल्प लवकरच सुरु होतील अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती.

Exit mobile version