जागतिक महिला दिनी पंतप्रधान मोदींकडून मोठी भेट; सिलेंडरच्या किंमतीत १०० रुपयांची कपात

महिलांना मिळणार दिलासा

जागतिक महिला दिनी पंतप्रधान मोदींकडून मोठी भेट; सिलेंडरच्या किंमतीत १०० रुपयांची कपात

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिला भगिनींना मोठी भेट दिली आहे. नारी शक्तीचा सन्मान करत त्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत तब्बल १०० रुपयांची कपात करण्याची घोषणा केली आहे. १ मार्च रोजी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या किंमतीत वाढ केली होती. पण, घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल केला नव्हता. दरम्यान, शुक्रवार, ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी सिलेंडरच्या किंमती १०० रुपयांनी स्वस्त करण्यात आल्या आहेत. सबसिडी असलेला १४.२ किलोग्राम घरगुती गॅस आता शंभर रुपयांनी स्वस्त झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात ट्विट केले आहे की, “आज महिला दिनानिमित्त एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच शिवाय करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारेल.”

हे ही वाचा :

मोहम्मद शमी उतरणार निवडणुकीच्या मैदानात?

रोहतकची जागा अभिनेता रणदीप हुड्डाला?

बेंगळुरूत पाण्याची भीषण टंचाई

उत्तर प्रदेशात सपाला आणखी एक धक्का बसणार!

जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांना ही मोठी भेट दिल्याचे बोलले जात आहे. या निर्णयानं सर्वसामान्यांना महिलांना दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारनं एलपीजी सिलेंडरवरील अनुदान एक वर्षासाठी वाढवले आहे. पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३१ मार्च २०२५ पर्यंत एलपीजी सिलेंडरवर अनुदान मिळणार आहे. सुमारे १० लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना वर्षभरात १२ सिलिंडरवर सबसिडी मिळणार आहे. यापूर्वीही सरकारने रक्षाबंधनानिमित्त घरगुती गॅस सिलिंडरची (१४.२ किलो) किंमत २०० रुपयांनी कमी केली होती. पंतप्रधान मोदींनी ओणम आणि रक्षाबंधन या सणांच्या निमित्ताने भाव कमी करून भगिनींना मोठी भेट दिली होती.

Exit mobile version