अरविंद वैश्यच्या हत्ये प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा जणांचा शोध सुरु आहे. मात्र, एक २३ वर्षीय मुस्लिम युवक येतो आणि चाकूने हल्ला करून फरार होतो. याचा अर्थ असा होतो की यामध्ये मोठे कारस्थान आहे, बड्या गँगचा समावेश आहे. या नव्या जिहाद्यांचा आका म्हणजे उद्धव ठाकरे असून त्यामुळे अशा लोकांच्या हिमतीत वाढ झाली आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. अरविंद वैश्यच्या हत्ये प्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात पोलिसांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या प्रसार माध्यमांशी साधताना बोलत होते.
धारावी येथील राजीव गांधी नगर मध्ये राहणारा अरविंद वैश्य (२७) या हिंदू तरुणाची रविवारी रात्री काही मुस्लिम तरुणांनी भोसकून हत्या केली होती. यानंतर मंगळवारी (३० जुलै) अरविंद वैश्य याच्या अंत्ययात्रेवर याआधी दगडफेक देखील करण्यात आली. यावर सर्व स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.दरम्यान, यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठा दावा केला आहे.
हे ही वाचा:
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूची बॅडमिंटन महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक
बनावट आयुष्यमान कार्ड बनवून योजनेचा लाभ, ईडीचे १९ ठिकाणी छापे !
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडीला पॅरोलवर सुट्टी देण्यास नकार
अखेर अधीर रंजन चौधरी यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा
किरीट सोमय्या म्हणाले की, या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात असून उर्वरितांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. आम्हाला देखील काही समजत नाहीये आणि पोलीस देखील काही सांगत नाहीयेत. मुस्लिम युवकाने तरुणावर छोट्या चाकूने हल्ला करून पळून जाणे हे पटण्याजोगे नाही. यामध्ये मोठे कारस्थान आहे, बड्या गँगचा समावेश आहे. पोलिसांसमोरच दगड फेकीची घटना घडली, त्यामुळे लँड जिहाद्यांची वाढलेली हिम्मत पाहून आश्चर्य वाटत आहे.
ते पुढे म्हणाले की, लँड जिहादचे खूप फायदे आहेत. लँड जिहाद खालच्या व्यवस्थेला मंद करण्याचे काम करत आहेत अन दुसरी यामध्ये राजकारणी लीडरची महत्वाची भूमिका आहे. कारण पॉलिस्टीकल आका आता लँड जिहाद, लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहेत. धारावीत देखील व्होट जिहाद झाल्याचे मी सांगितले. तसे उद्धव ठाकरे देखील नव्या जिहादचे आका बनले आहेत. त्यामुळे यांची एवढी हिम्मत वाढली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी सर्व आठ आरोपीना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी पीडित कुटुंबांची मागणी असून सरकारने देखील यांची नोंद घ्यावी, असे किरीट सोमैया यांनी सांगितले.