शिमल्यात अवैध मशिदीविरोधात हिंदूंचा संताप, उग्र आंदोलन !

पोलिसांचा लाठीमार, आंदोलकांवर पाण्याचा मारा

शिमल्यात अवैध मशिदीविरोधात हिंदूंचा संताप, उग्र आंदोलन !

हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला येथील संजौली येथे मोठ्या प्रमाणात हिंदू संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. संजौली येथील मशिदीच्या बेकायदा बांधकामाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात पुरुष,महिला, विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

अवैध मशिदी हटवण्याची मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात येत आहे, यासाठी काल शांततेत मोर्चाही काढण्यात आला होता. हिंदू संघटनांकडून ११ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. आंदोलन स्थगित करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि हिंदू संघटना यांच्यात चर्चाही झाली मात्र, ती निष्फळ ठरली. अखेर आज मोठ्या हिंदू जनसमुदाय मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी झाला.

हे ही वाचा : 

कालिंदी एक्स्प्रेस प्रकरणात नामचीन गुंड शाहरुखला अटक !

जगप्रसिद्ध चित्रकार एस.एच. रझा यांच्या कोट्यवधीच्या पेंटिंगची चोरी

‘राहुल गांधी, सोनिया गांधींनी चिनी कम्युनिस्ट पार्टीशी असा कोणता करार केला?’

राहुल गांधींचा अजब दावा… भारतात शिखांना पगडी, कडे घालू द्यायचे की नाही, यावरून संघर्ष!

यावेळी पोलिसांकडून लावण्यात आलेले अडथळे देखील उचलून फेकण्यात आले. मशिदी हटवण्यासाठी हिंदू संघटना एकवटल्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाकडून पाण्याचा मारा देखील करण्यात येत आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जवर आंदोलकही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रशासनाने अवैध मशिदी हटवण्याचे आश्वासन लोकांना दिले होते, मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने आज हिंदू समुदाय एकवटला आणि निदर्शने, घोषणाबाजी केली. या हिंदुत्ववादी संघटनांमध्ये भाजपच्या संघटनाही सामील झाल्या आहेत.

Exit mobile version