मोटार वाहन कायद्यात होणार मोठे बदल!

मोटार वाहन कायद्यात होणार मोठे बदल!

वाहन चालकांनसाठी व वाहनातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता नवीन नियम आणि बदल करण्यात येणार आहेत. अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी एकाच वेळी अपघातात मृत्यू पावल्याच्या घटनेने मोटार वाहन कायद्यातील त्रुटींचा नव्याने फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे गडकरी म्हणाले. ते म्हणाले, सध्या फक्त वाहन चालक व चालकाच्या प्रवाशाला एअर बॅग्समुळे सुरक्षा मिळते.

कायद्यातील प्रमुख बदल

दरम्यान, काही दिवसांपूर्वी किया कंपनीने त्यांच्या कारमध्ये एअरबॅग संबंधी त्रुटी आढळून आल्याने कंपनीने आपल्या चार लाखाहून अधिक कार बाजारातून परत मागवल्या होत्या.

हे ही वाचा:

आयपीएल लिलावादरम्यान ऑक्शनर ह्यू एडमिट्स कोसळले

हिजाब वादाप्रकरणी आयबीने दिला पाच राज्यांना सतर्कतेचा इशारा!

हिजाबच्या समर्थानात काँग्रेसचे आंदोलन, पण महिला कार्यकर्त्यांचा आपसातच राडा

धक्कादायक! मोदीविरोधक पत्रकार राणा अय्युबने पीएम केअरला दिली देणगी

काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी एअरबॅग्स संदर्भात एक ट्विट केले होते. “आठ प्रवासी क्षमता असलेल्या मोटार वाहनांसाठी किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या मसुद्याच्या जीएसआर अधिसूचनेला मंजुरी दिली आहे. M1 वाहन श्रेणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, कारण पुढील आणि मागील रांगेतील प्रवाशांसाठी चार अतिरिक्त एअरबॅग प्रदान करणे बंधनकारक आहे.” असे ट्विट गडकरी यांनी केले होते.

 

Exit mobile version