29 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरविशेषमोटार वाहन कायद्यात होणार मोठे बदल!

मोटार वाहन कायद्यात होणार मोठे बदल!

Google News Follow

Related

वाहन चालकांनसाठी व वाहनातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता नवीन नियम आणि बदल करण्यात येणार आहेत. अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी एकाच वेळी अपघातात मृत्यू पावल्याच्या घटनेने मोटार वाहन कायद्यातील त्रुटींचा नव्याने फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे गडकरी म्हणाले. ते म्हणाले, सध्या फक्त वाहन चालक व चालकाच्या प्रवाशाला एअर बॅग्समुळे सुरक्षा मिळते.

कायद्यातील प्रमुख बदल

  • मोटार गाडीतील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य
  • आठ आसनी वाहनपर्यंत सर्व प्रवाशांना एअर बॅग्स सक्तीचे राहील.
  • वाहनांच्या हॉर्नच्या आवाजावर नियंत्रण
  • सर्व वाहनांमध्ये ब्रेकसंदर्भात एबीएस प्रणाली असेल
  • दिव्यांग व्यक्तींसाठी वाहनांच्या रचनेमध्ये रचनेमध्ये बदल केले जातील
  • चालकाला जर झोप येत असल्यास वाहनातील अलार्म सुरु होणार
  • नियमित अपघात होणाऱ्या जागेवर वाहने गेल्यानंतर तेथे चालकाला धोक्याची सुचना दिली जाणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी किया कंपनीने त्यांच्या कारमध्ये एअरबॅग संबंधी त्रुटी आढळून आल्याने कंपनीने आपल्या चार लाखाहून अधिक कार बाजारातून परत मागवल्या होत्या.

हे ही वाचा:

आयपीएल लिलावादरम्यान ऑक्शनर ह्यू एडमिट्स कोसळले

हिजाब वादाप्रकरणी आयबीने दिला पाच राज्यांना सतर्कतेचा इशारा!

हिजाबच्या समर्थानात काँग्रेसचे आंदोलन, पण महिला कार्यकर्त्यांचा आपसातच राडा

धक्कादायक! मोदीविरोधक पत्रकार राणा अय्युबने पीएम केअरला दिली देणगी

काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी एअरबॅग्स संदर्भात एक ट्विट केले होते. “आठ प्रवासी क्षमता असलेल्या मोटार वाहनांसाठी किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या मसुद्याच्या जीएसआर अधिसूचनेला मंजुरी दिली आहे. M1 वाहन श्रेणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, कारण पुढील आणि मागील रांगेतील प्रवाशांसाठी चार अतिरिक्त एअरबॅग प्रदान करणे बंधनकारक आहे.” असे ट्विट गडकरी यांनी केले होते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा