‘दादागिरी करणारे देश ४.५ अब्ज डॉलरची मदत देत नाहीत’

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची मालदीवच्या अध्यक्षांवर टीका

‘दादागिरी करणारे देश ४.५ अब्ज डॉलरची मदत देत नाहीत’

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी ‘कोणीही आमच्यावर दादागिरी करू शकत नाही’, असे वक्तव्य करून अप्रत्यक्षपणे भारताला लक्ष्य केले होते. त्यावर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ‘दादागिरी करणारे मोठे देश ४.५ अब्ज डॉलरची मदत करत नाहीत,’ असे उत्तर त्यांनी दिले.

भारत हिंदी महासागर क्षेत्रात दादागिरी करतो आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता, जेव्हा शेजारचा देश तणावाखाली असतो, तेव्हा असे देश ४.५ अब्ज डॉलरची मदत करत नाहीत, असा टोला त्यांनी मारला. जयशंकर यांच्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ या पुस्तकाच्या प्रसिद्धीसोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. जयशंकर यांनी शेजारचा देश संकटातून जात असताना भारताने नेहमीच मदत केली आहे, याचा पुनरुच्चार केला.

हे ही वाचा:

हिमाचल, लडाख, जम्मू काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी!

शाहबाज शरीफ यांचा आळवला काश्मीर राग!

लाच प्रकरणी NHAI च्या अधिकाऱ्यासह सहा जण अटकेत

निवडणुकीत दारुण पराभव दिसू लागल्याने ठाकरेंचं ईव्हीएमवर बोट!

‘शेजारी राष्ट्रे संकटात असताना मोठे दादागिरी करणारे देश ४.५ अब्ज डॉलरची मदत देत नाहीत. करोनाकाळात असे देश इतर देशांना लस पुरवत नाहीत किंवा अन्नाच्या मागणीला किंवा इंधनाच्या मागणीला किंवा खतांच्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या नियमांना अपवाद करतात, कारण जगाच्या इतर भागांतील परिस्थिती बिकट आहे, तेथील लोकांचे जीवन संकटात आहे, याची जाणीव भारताने नेहमीच ठेवली आहे,’ असे जयशंकर यांनी शनिवारी सांगितले.

Exit mobile version