तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द!

नीतिमत्ता समितीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची केली होती शिफारस

तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द!

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लाच घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणी त्यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात संसदेच्या नीतिमत्ता समितीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी संसदेच्या नीतिमत्ता समितीने आपला अहवाल लोकसभेत सादर केला, त्यावर लोकसभेत चर्चेनंतर महुआ मोईत्रा यांची संसद सदस्यत्वातून हकालपट्टी करण्यात आली आहे.टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी अनैतिक, आक्षेपार्ह आणि गंभीर गुन्हा केल्याचे संसदेच्या नीतिमत्ता समितीच्या अहवालात म्हटले आहे.भारत सरकारने या प्रकरणाची कायदेशीर आणि संस्थात्मक चौकशी करावी,अशी शिफारस अहवालात करण्यात आली.

हे ही वाचा:

‘वाँटेड’ गुन्हेगारांनी भारतात या आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा!

पुतिन यांच्याकडून मोदींचे कौतुक; ‘भारताच्या हितरक्षणासाठी मोदी कठोर भूमिका घेतात’

तब्बल अडीच वर्षाने परतली टी-४२ वाघीण!

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर पाय घसरून पडले, पंतप्रधान मोदींनी बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा!

 

महुआ मोइत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून भेटवस्तू म्हणून कार आणि २ कोटी रुपयांची रोकड स्वीकारल्याचा आरोप होता.त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर कारवाई करत त्यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांनी म्हटलं की, मी अदानी मुद्द्यावर भाष्य केल्यामुळे माझं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. नीतिमत्ता समितीसमोर माझ्याविरुद्ध कोणताही मुद्दा नव्हता, कोणताही पुरावा नव्हता. त्यांचा एकच मुद्दा होता की मी अदानीचा मुद्दा उपस्थित केला होता.दरम्यान, उद्योगपती हिरानंदानी यांनी शपथपत्रात कबूल केले आहे की, पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी मोईत्रा यांनी गौतम अदानी यांना लक्ष्य केले.

Exit mobile version