दिल्ली: विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘आप’ला धक्का, पाच नगरसेवक भाजपात !

दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

दिल्ली: विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘आप’ला धक्का, पाच नगरसेवक भाजपात !

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे पाच नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि भाजप नेते रामवीर सिंग बिधुरी यांच्या उपस्थितीत आपच्या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रविवारी (२५ ऑगस्ट) दिल्लीतील भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश पार पडला. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या या नगरसेवकांवर वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, आप’मध्ये  घुसमट होत असल्याने पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये सुगंधा बिधुरी, राम चंद्र, पवन सेहरावत, मंजू निर्मल, ममता पवन यांचा समावेश आहे. या नगरसेवकांसह त्यांच्या पुरुष, महिला कार्यकर्त्यांनीहि भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचं पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आपला जोरदार धक्का बसला आहे.

हे ही वाचा :

चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पक्षाच्या (रामविलास) अध्यक्षपदी फेरनिवड

पंतप्रधान मोदींनी ‘लखपती दिदीं’शी साधला संवाद !

आंदोलनात ‘सर तन से जुदा’ घोषणा देणाऱ्या ३०० जणांवर गुन्हा

विकसित भारताच्या वाटचालीत मातृशक्तीचा मोठा हातभार; लखपती दीदींना मोदींचे अभिवादन !

दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पक्ष प्रवेशावर म्हणाले की, नेत्यांची स्वतःच्या पक्षात घुसमट होत असल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, आम्हाला आमच्या क्षेत्रात काम करायचे आहे, मात्र पक्षाने आम्हाला भ्रष्टाचार आणि जमाव एकत्र करण्याचे साधन बनवले, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या विकास कार्याला त्यांनी महत्व देत दिल्लीमध्ये देखील बदल होवन प्रगती व्हावी अशी त्यांची इच्छा आहे, म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, असे वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितले.

Exit mobile version