27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेष'तू माझा मुलगा आहेस हे सांगताना अभिमान वाटतो'! 'बिग बी' नी ...

‘तू माझा मुलगा आहेस हे सांगताना अभिमान वाटतो’! ‘बिग बी’ नी केले अभिषेकचे कौतुक

Google News Follow

Related

हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचे भरभरून कौतुक केले आहे. तू माझा मुलगा आहेस हे सांगताना मला अभिमान वाटतो असे म्हणत बिग बी यांनी अभिषेक बच्चनचे पाठ थोपटली आहे. अभिषेक बच्चनच्या बॉब बिस्वास या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हे ट्रेलर शेअर केले आहे. त्याचवेळी त्यांनी अभिषेकचे तोंडभरून कौतुक केले.

अभिषेक बच्चन, चित्रांगदा सिंग यांच्या मुख्य भूमिका असलेल्या बॉब बिस्वास हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली असून सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुजोय घोष यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

हे ही वाचा:

आनंद महिंद्रना बुटांच्या स्टार्टअपचा ‘आशय’ भावला!

३९ हजार झाडांची कत्तल करण्याची कशी दिली परवानगी? आदित्य ठाकरेंना सवाल

घरातला गॅस संपला आणि एसटी कर्मचाऱ्याने जीवनही संपविले

‘एसटी महिला कर्मचारी अनिल परबांची साडी चोळी नारळाने ओटी भरतील’

काही वर्षांपूर्वी सुजोय घोष यांनी दिग्दर्शित केलेला कहानी या चित्रपटात बॉब बिस्वास नावाचे एक पात्र दाखवण्यात आले होते. इन्शुरन्स एजंट म्हणून नोकरी करणारा हा इसम कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणून काम करत असतो. त्याच्यावरच आधारित बॉब बिस्वास हा नवा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन हे बॉब बिस्वास हे मुख्य पात्र साकारत आहेत.

या चित्रपटाचे ट्रेलर पाहून अभिषेक बच्चन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. हे ट्रेलर रसिकांच्या पसंतीस पडत असून अभिषेक यांच्या अभिनयाची खूप मोठ्या प्रमाणात स्तुती देखील होत आहे. त्यामुळे बॉब बिस्वास हा चित्रपट सुपरहिट ठरणार असे मत जाणकार व्यक्त करताना दिसत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा