१८ जानेवारीला पृथ्वीजवळून जाणार भलामोठा लघुग्रह!

१८ जानेवारीला पृथ्वीजवळून जाणार भलामोठा लघुग्रह!

खगोलशास्त्रज्ञांसाठी पुढील आठवडा एक रोमांचक काळ असेल. कारण एक मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येणार आहे. आणि १८ जानेवारी २०२२ रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार आहे, अशी माहिती नासाच्या सेंटर फॉर नियर अर्थ स्टडीजने दिली आहे. त्या लघुग्रहाला ७४८२ (1994 PC1) असे नाव देण्यात आले आहे.

नासाच्या म्हणण्यानुसार, या लघुग्रहाचा व्यास १.०५२ किलोमीटर आहे. आणि फिरण्याचा कालावधी सुमारे २.६ तास आहे. अर्थस्कायच्या म्हणण्यानुसार हा लघुग्रह अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील गोल्डन गेट ब्रिजच्या आकाराचा आहे. स्पेस एजन्सीने त्याचे आकारमान आणि आपल्या ग्रहाच्या तुलनेने जवळच्या फ्लायबायसमुळे संभाव्य धोकादायक लघुग्रह म्हणून त्याचे वर्गीकरण केले आहे.

एवढा मोठा लघुग्रह पृथ्वीजवळून अंदाजे दर सहा लाख वर्षांनी एकदा पृथ्वीच्या दिशेने येतो. तथापि, 1994 PC1 हा लघुग्रह जवळ येत असूनही लोकांना काळजी करण्याची गरज नाही, कारण तो सुरक्षितपणे पृथ्वीजवळून जाणार आहे. असे earthsky.org अहवालात म्हटले आहे.

लघुग्रह ७४८२ (1994 PC1) बद्दल ९ ऑगस्ट १९९४ रोजी ऑस्ट्रेलियातील साइडिंग स्प्रिंग वेधशाळेत रॉबर्ट मॅकनॉट यांनी हा संभाव्य धोकादायक लघुग्रह शोधला होता. खगोलशास्त्रज्ञांनी याआधीही या लघुग्रहाचे निरीक्षण केले होते, काही निरीक्षणे सप्टेंबर १९७४ पासून आहेत. खगोलशास्त्रज्ञांना त्याच्या प्रक्षेपणाची माहिती होती आणि त्यांनी ४७ वर्षांच्या निरीक्षणांचा वापर करून त्याची कक्षा निश्चित केली होती.

हे ही वाचा:

कोरोना संसर्ग झालेल्या दोन कोटी लोकांना पेटीत केले बंद

छगन भुजबळ अडचणीत; क्लीन चीटला उच्च न्यायालयात आव्हान  

ठाकरे सरकारची प्रताप सरनाईकांवर कृपादृष्टी

वर्ध्यात गोबर गॅस टाकीत सापडल्या कवड्या, हाडे; अवैध गर्भपाताचे रॅकेट?

 

अर्थस्काय संस्थेच्या माहितीनुसार , हा लघुग्रह १८ जानेवारी रोजी ४:५१ वाजता EST (१९ जानेवारी पहाटे ३.२१ वाजता) पृथ्वीच्या सर्वात जवळ येईल. हा लघुग्रह पृथ्वीजवळून १.२ दशलक्ष मैल म्हणजेच १.९३ दशलक्ष किलोमीटर अंतरावर जाईल. हे अंतर पृथ्वी-चंद्राच्या अंतराच्या अंदाजे ५ पट जास्त अंतर आहे. लघुग्रह पाहण्यासाठी लोक लहान दुर्बिणीचा वापर करू शकतात.

Exit mobile version