मोठी घोषणा! ४० हजार सामान्य बोगी आता वंदे भारतप्रमाणे

अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला

मोठी घोषणा! ४० हजार सामान्य बोगी आता वंदे भारतप्रमाणे

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. यावेळी रेल्वेसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. तीन नवीन रेल्वे इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधले जातील, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. हे कॉरिडॉर ऊर्जा, खनिजे आणि सिमेंटसाठी असतील. या प्रकल्पाची ओळख पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात मोदी सरकारने भर दिला आहे. तीन नवीन रेल्वे इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधले जाणार आहेत. हे कॉरिडॉर ऊर्जा, खनिजे आणि सिमेंटसाठी असणार आहेत. वंदे भारत ट्रेन्समध्ये जसे डब्बे आहेत, तसे अन्य ट्रेन्सचे ४० हजार डब्बे बनवण्यात येतील, अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. यामुळे पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारेल आणि गाड्यांमधील प्रवास सुरक्षित होईल.

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने रेल्वेवर सर्वाधिक भर दिला होता. २०२३ च्या एकूण ४५ लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये रेल्वेचा वाटा २.४ लाख कोटी रुपये होता. मोदी सरकारच्या कार्यकाळात रेल्वेसाठी अर्थसंकल्पातील तरतूद सातत्याने वाढली आहे. पूर्वी रेल्वेसाठी वेगळा अर्थसंकल्प सादर केला जात होता. २०१७ पासून यात बदल झाला. गेल्या सात वर्षांपासून रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पाचा भाग म्हणून सादर होत आहे.

हे ही वाचा:

अर्थसंकल्पात मोठी घोषणा; आशा, अंगणवाडी सेविकांना ‘आयुष्मान भारत’चा लाभ मिळणार

“गरीब, महिला, युवा, अन्नदाता यांच्यावर लक्ष केंद्रीत”

“सर्वांचा पाठिंबा, विश्वास, प्रयत्न या मंत्रानेचं पुढे जातोय”

इम्तियाज जलील यांच्यासह ५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल

निर्मला सीतारमण यांनी सरकारकडून सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच या योजनांमुळे देशात किती बदल झाला, त्याची आकडेवारी सादर केली. यंदाच्या अर्थसंकल्पात महिला, युवा वर्गावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अंतरिम अर्थसंकल्प असल्यामुळे सकाळी ११ वाजता सुरु झालेले अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण १२ वाजता पूर्ण झाले.

Exit mobile version