अंमली पदार्थ आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मोठी कारवाई केली. चेन्नई-स्थित डीएमके नेते जाफर सादिक आणि त्याच्या काही सहकाऱ्यांविरुद्ध ड्रग्ज मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की, फेडरल एजन्सीने २ सप्टेंबर रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत १४ मालमत्ता जप्त करण्याचा आदेश जारी केला होता, ज्यात जेएसएम रेसिडेन्सी हॉटेल, एक आलिशान बंगला आणि जग्वार आणि मर्सिडीज सारख्या सात कार आहेत वाहनांचा समावेश आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा :
‘शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ, लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणे गैर’
जम्मू काश्मीर निवडणूक: पंतप्रधान मोदी, गडकरींसह ४० नेत्यांकडे सूत्रे !
केनियामध्ये शाळेच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू
चाकरमानी निघाले गावाला; वाहतूक कोंडीचा ताप डोक्याला
जप्त करण्यात आलेली मालमत्ता आरोपींनी गुन्हेगारी-गैर मार्गाने मिळविल्याचा दावा ईडीने केला आहे. जाफर सादिक द्रमुकशी संबंधित असून ते तमिळ चित्रपटांचे निर्माते आहेत. जाफरवर ड्रगचा पैसा हॉटेल्स बांधण्यासाठी, मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि डीएमकेला निधी देण्यासाठी वापरल्याचा आरोप आहे. या पैशातून त्यांनी चित्रपटही बनवल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.