दिल्लीत सापडले ८ बांगलादेशी नागरिक, बांगलादेशला रवानगी!

जंगल मार्ग आणि एक्स्प्रेस गाड्यांचा वापर करत भारतात प्रवेश 

दिल्लीत सापडले ८ बांगलादेशी नागरिक, बांगलादेशला रवानगी!

दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांकडून बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. पोलीस शोध मोहीम राबवत बेकादेशीर स्थलांतरीत झालेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक करून त्यांना बांगलादेशला पाठवण्याचे काम केले जात आहे. पोलिसांच्या शोध मोहिमेत ८ बांगलादेशी नागरिक हाती लागले आहेत, जे बेकादेशीर भारतात प्रवेश करून दिल्लीत राहत होते.

बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांसह बेकायदेशीर स्थलांतरितांची पडताळणी करण्याची मोहीम संपूर्ण दक्षिण पश्चिम जिल्ह्यात राबविण्यात आली होती. घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली आणि जवळपास ४०० कुटुंबांची तपासणी करत त्यांची कागदपत्रे गोळा करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान, रंगपुरी भागात राहणारे जहांगीर, त्याची पत्नी परीना बेगम आणि त्यांची सहा मुले अवैध स्थलांतरित असल्याचे आढळून आले. हे लोक बांगलादेशातील मदारीपूर जिल्ह्यातील केकरहाट गावचे रहिवासी असून जंगलाच्या मार्गाने आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या माध्यमातून भारतात आले आणि त्यानंतर दिल्लीत स्थायिक झाल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, बेकायदेशीरपणे दिल्लीत राहणाऱ्या या बांगलादेशी कुटुंबाला पोलिसांनी बांगलादेशाला पाठवले आहे. तसेच पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे.

हे ही वाचा : 

अफगाण तालिबानचा पाकिस्तानवर हल्ला

लडाखमध्ये पँगाँग किनाऱ्याला १४ हजार फुटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा!

भिंतीला हिरवा रंग, फुले-चादर चढवली, भाजपा माजी आमदाराने हिरव्या रंगावर दिला भगवा रंग!

दक्षिण कोरियाच्या विमान अपघातात १७९ जणांचा मृत्यू!

 

Exit mobile version