पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने पाठवले ‘यमसदनी’

घूसखोराकडून २७० रुपये किमतीचे पाकिस्तानी चलन जप्त

पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने पाठवले ‘यमसदनी’

पंजाबमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) प्रवक्त्याने मंगळवारी (१७ सप्टेंबर) या घटनेची माहिती दिली.

बीएसएफ अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी रात्री ९.१५ च्या सुमारास अमृतसर जिल्ह्यातील रतनखुर्द गाव परिसरात आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतात घुसखोर करणाऱ्या एका व्यक्तीला पाहण्यात आले. सीमेवर तैनात असलेल्या जवानांनी त्या घुसखोराला थांबण्यास सांगून चेतावणी दिली, मात्र घुसखोर अंधाराचा फायदा घेत सुरक्षा कुंपणाच्या दिशेने चालतच राहिला.

हे ही वाचा : 

बुलढाणा; जळगाव जामोद शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक !

लेबनॉनमध्ये स्फोट झालेले तैवान निर्मित पेजर्स युरोपियन कंपनीने बनवले

डोनाल्ड ट्रम्प घेणार पंतप्रधान मोदींची भेट; मोदी ‘फँटास्टिक नेते’ म्हणत काढले गौरवोद्गार!

लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांकडील हजारो पेजर्सचा एकाच वेळी स्फोट

अधिकाऱ्याने पुढे सांगितले, घुसखोराला अनेक वेळा चेतावणी देण्यात आली, अखेर कर्तव्यावर असलेल्या जवानांनी घुसखोरावर गोळीबार केला, यामध्ये तो जागीच ठार झाला. त्याच्याकडून पाकिस्तानी चलनी नोटा सापडल्या (२७० रुपये), ते जप्त करण्यात आले आहे. घुसखोराचा मृतदेह घरिंडा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सुरक्षा दलाने सांगितले.

 

Exit mobile version