गुजरात एटीएसने सुरतमध्ये मोठी कारवाई केली आहे. सुरतमधील एका औद्योगिक कारखान्याच्या युनिटवर पथकाने छापा टाकत तब्बल २० कोटी रुपयांचा ड्रग्सचा कच्चा जप्त केला आहे. हे युनिट सुरतच्या पलसाना तालुक्यात आहे. याप्रकरणी एटीएसकडून २ जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कारखान्यात ड्रग्ज बनवले जात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. माहितीच्या आधारे बुधवारी(१७ जुलै) रात्री एटीएसच्या पथकाने घटनास्थळी पोहचून छापा टाकला. संपूर्ण आवारात जाऊन पाहणी केली असता ड्रग्ज बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य दिसले. त्यानंतर पथकाने हे युनिट सील केले.
या छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध औषधे जप्त करण्यात आली, ज्यांची किंमत २० कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. छाप्यादरम्यान पोलिसांनी या कारखान्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावेही ताब्यात घेतले आहेत. बेकायदेशीर औषधांचे उत्पादन आणि वितरण केल्याच्या आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांची चौकशी सुरू आहे. औद्योगिक युनिटच्या मालकाची ओळख पटलेली नसल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये पुन्हा चकमक; लष्कराचे दोन जवान जखमी
हाथरस चेंगराचेंगरीवर भोले बाबा म्हणतो, मृत्यू अटळ आहे, ‘आज ना उद्या मरायचे आहे’
गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक, १२ माओवाद्याना कंठस्नान !
पोलीस कोठडीचे गज वाकवून आरोपीचे पलायन, सांताक्रूझ वाकोल्यातील घटना !
याआधीही गुजरातमध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या युनिटवर कारवाई करण्यात आली होती. एप्रिलमध्ये एटीएस आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने संयुक्तपणे छापा टाकला होता. त्यावेळी २३० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. याशिवाय १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
Gujarat ATS has busted a drugs manufacturing unit in Surat's Palsana taluka and seized raw materials worth approximately Rs 20 crores. Two persons arrested. The factory has been sealed: Gujarat ATS DIG Sunil Joshi pic.twitter.com/4lN7lod2c6
— ANI (@ANI) July 18, 2024