दक्षिण पश्चिम जिल्ह्याच्या अंमली पदार्थ विरोधी युनिटने शुक्रवारी (२६ डिसेंबर) एका अवैध बांगलादेशी महिलेला हद्दपार करण्याची कारवाई केली. दिल्लीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या शोधादरम्यान एका २८ वर्षीय महिलेला ताब्यात घेण्यात आले.
सोनाली शेख असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी महिलेचे नाव आहे. विदेशी कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून ती गेल्या ६ वर्षांपासून भारतात अवैधरित्या राहत होती. या तरतुदींनुसार, अंमली पदार्थ विरोधी युनिटने महिलेला ताब्यात घेतले आणि तिला बांगलादेशला परत पाठवले.
मंगळवारी (२४ डिसेंबर) दिल्ली पोलिसांनी बनावट ओळखपत्र आणि कागदपत्रे बनवणाऱ्या ११ जणांना अटक केली. यामध्ये ५ बांगलादेशी आणि ६ स्थानिक लोकांचा समावेश आहे. हे लोक बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड यांसारखी बनावट कागदपत्रे देऊन दिल्लीतील विविध भागात पाठवायचे. याआधीही एलजी विनय सक्सेना यांच्या आदेशावरून दिल्ली पोलीस आणि इतर यंत्रणांनी १७५ बांगलादेशींना ताब्यात घेतले होते. पोलिसाकडून शोध मोहीम राबवत कारवाई करण्यात येत आहे.
हे ही वाचा :
दिल्ली विद्यापीठात हिंदू अभ्यासात पीएचडी कार्यक्रम सुरू होणार
“डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करताना बुद्धिमत्ता आणि विनम्रतेचे दर्शन घडायचे”
बांगलादेशींना हाकलण्यासाठी सरकार सज्ज… जनता सजग आहे काय?
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन, ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास