पहलगाम हल्ला: काश्मीरमध्ये १४५० जणांना घेतले ताब्यात!

सुरक्षा दलांकडून चौकशी सुरु 

पहलगाम हल्ला: काश्मीरमध्ये १४५० जणांना घेतले ताब्यात!

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमध्ये २५० हून अधिक ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) यांना ताब्यात घेतले आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी इतर सुरक्षा एजन्सींच्या सहकार्याने सुरू केलेल्या सखोल चौकशी आणि तपासणी मोहिमेचा भाग म्हणून या लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय, काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या सुमारे १२०० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. असे एकूण १,४५० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे.

हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. असे मानले जाते कि हे अटक करण्यात आलेले ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) हल्लेखोरांना लॉजिस्टिक किंवा गुप्तचर मदत पुरविण्याचे काम करतात. सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमध्ये २५० हून अधिक ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) यांना ताब्यात घेतले आहे. तपासामध्ये मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये, मदतीला आला वेग

“सरकारच्या हिंदुत्ववादी धोरणांमुळे झाला हल्ला” रॉबर्ट वाड्रा यांच्याकडून वादग्रस्त विधान

हिंदूंच्या अंगावर याल तर सगळे हिंदू तुमच्या अंगावर येवू, शक्ती कळायलाच हवी!

“कलमा म्हणू शकलो म्हणून वाचलो…” हिंदू प्राध्यापकाने सांगितली घटना

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान निवासस्थानी सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची (सीसीएस) बैठक सुरू आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित आहेत. या बैठकीत दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे. भूदल, नौदल आणि हवाई दलाला अलर्ट राहण्यास सांगितले आहे.

शेवटी त्यांनी शेण खाल्लेच ! | Mahesh Vichare | Sanjay Raut | Sushma Andhare | Pahalgam | Kashmir |

Exit mobile version