बंगालमध्ये दुर्गा विसर्जनात मोठी दुर्घटना,आठ मृत्यू

बंगालमध्ये दुर्गा विसर्जनात मोठी दुर्घटना,आठ मृत्यू

काल देशभरात दुर्गा विसर्जन पार पडले. मात्र, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. जलपायगुडीतील माल नदीत विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे आठ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

दुर्गा देवीच्या विसर्जनासाठी गेलेले किमान आठ जण बुधवारी रात्री उत्तर बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यातील माल नदीत अचानक आलेल्या पुरामुळे बुडाले. दुर्गा देवीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी नदीकाठावर मोठ्या संख्येने लोकांची गर्दी झाली होती. नदीकाठावर मोठ्या संख्येने लोक जमले होते. अचानक आलेल्या पुरामुळे काही सेकंदात पाण्याची पातळी सहा इंचांवरून साडेतीन फुटांवर गेली. अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे लहान मुलासह आठ जणांचा मृत्यू झाला असून तेरा जण जखमी आहेत. तसेच ३० ते ४० जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. एनडीआरएफची टीम रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होते. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुराच्या पाण्यात मूर्ती घेऊन जाणारी अनेक वाहने वाहून गेली.अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.

हे ही वाचा:

‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’

मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा कॉल

खड्ड्यात लपवलेले ४० लाख हस्तगत

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर मारला मर्मभेदक शब्दबाण

ही घटना रात्री ९.३० वाजता घडली. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतेक नद्यांप्रमाणेच माळ नदीलाही पूर येतो. ही दुर्घटना घडली तेव्हा कालिम्पॉंग टेकड्यांवर मुसळधार पाऊस पडत होता. नदीच्या वरच्या प्रवाहात पाण्याची पातळी वाढल्याची माहिती भाविकांना नव्हती, त्यामुळे ही दुर्घटना घडली असे सांगितले जातं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version